Manoj Jarange Patil | जरांगेंनी नारायण राणेंना खडसावलं, ”वयाचा आदर करत होतो…आता मी पाणउतारा करेन”

मुंबई : Manoj Jarange Patil | मला काही मर्यादा असल्याने शांत आहे. तुम्हाला आजवर मानत होतो. काही बोललो नाही. आता माझी शेवटची विनंती आहे. निलेश राणे (Nilesh Rane) यांनी नारायण राणे यांना समजवावे. पुढच्या वेळी मी त्यांना सोडत नसतो. पुढे कोण आहे हे बघणार नाही. त्यांच्या वयाचा आदर करत होतो. आमची भावना समजून घ्या, अन्यथा मी त्यांचा पाणउतारा करेन, असा सज्जड इशारा मराठा आरक्षण (Maratha Reservation) आंदोलनाचे नेते मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांनी केंद्रिय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांना दिला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महाराष्ट्रातील सभांबाबत मनोज जरांगे यांनी केलेल्या वक्तव्यानंतर भाजपाचे केंद्रिय मंत्री नारायण राणे यांनी एक्सवर जरांगे यांच्यावर कठोर टीका केली होती. या टीकेला आज जरांगे यांनी उत्तर दिले. ते अंतरवाली सराटी येथे पत्रकारांशी बोलत होते.

मनोज जरांगे म्हणाले, मी नारायण राणे यांना शेवटचे माफ करतो आणि सुट्टी देतो. निलेश राणे तुम्ही नारायण राणेंना थांबवा. कारण मलासुद्धा काही मर्यादा आहेत. अन्यथा मी इथून पुढे धुवून काढेन, कोणालाही सोडणार नाही. मी माझ्या मर्यादा सांभाळतोय. मी कधी तुम्हाला काही बोललो नाही. माझ्या तोंडून नारायण राणेंबद्दल एकही शब्द निघालेला नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ओबीसी असल्याचा अभिमान आहे. त्यांनी अनेकदा त्यांच्या भाषणात त्याचा उल्लेख केला आहे. मग आम्हाला मराठा असल्याचा अभिमान का असू नये.

मनोज जरांगे म्हणाले, नारायण राणे तुम्ही पूर्वी मराठा-मराठा करून छाती बडवत होता. आता तुम्हाला काय झालं आहे.
मी मराठ्यांसाठी बोलतोय. त्यामुळे तुम्ही माझ्या बाजून बोलायला हवं होतं. मी तुम्हाला कधी काही बोललो नाही, तुमच्याबद्दल चकार शब्द काढला नाही. मग तुम्ही कोणाची री ओढताय? उगाच काहीही बोलायला तुम्ही एकटेच तीरसिंगराव लागून गेला का?

मनोज जरांगे म्हणाले, नारायण राणे यांना पाच वेळा इशारा दिला आहे. परंतु, ते काही ऐकत नाही.
आता त्यांना शेवटची संधी देत आहे. मुद्दाम निलेश राणे यांना सांगतोय ही वडिलांना सांगा, उद्या ते काही बोलले तर
मी सोडणार नाही. त्यांना खेटायचेच असेल तर माझीही तयारी आहे.

काय म्हणाले होते नारायण राणे…
दोन दिवसांपूर्वी एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये नारायण राणे यांनी म्हटले होते की, मनोज जरांगे पाटील याच्‍या
डोक्‍यावर परिणाम झाल्‍यामुळे तो आता काहीही बडबड करायला लागला आहे. त्‍याला मी मराठयांचा नेता मानत नाही.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना महाराष्‍ट्रात फिरु देणार नाही अशी बेताल बडबड त्याने केली.
त्‍याने आता मर्यादा ओलांडली आहे. पंतप्रधान जेव्‍हा महाराष्‍ट्रात येतील त्‍यावेळी जागेवरुन हलून दाखव,
तुला असली मराठ्यांची ताकद दाखवून दिली जाईल. आपली औकात ओळखावी आणि अंथरुणावर पडून राहून नाटकं करावी!

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

जुन्या वादातून धारदार शस्त्राने वार, 5 आरोपींना अटक; कोंढवा पोलिसांची कारवाई

पुणे : भररस्त्यात मिठी मारुन तरुणीचा विनयभंग, आरोपीला अटक

दारुच्या नशेत महिलेवर बलात्कार, जंगली महाराज रोडवरील घटना