Pune Ganpati Visarjan Miravnuk 2023 | गणपती बाप्पा मोरया… पुढच्या वर्षी लवकर या…, पुण्यातील मुख्य मिरवणुकीला 10.30 वाजता सुरुवात

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Ganpati Visarjan Miravnuk 2023 | पुणे शहरातील गणेशोत्सव (Pune Ganeshotsav 2023) देशभरात प्रसिद्ध असून मंडई चौक आणि लक्ष्मी रोडवरील वसर्जन मिरवणुक पाहण्यासाठी हजारो गणेश भक्त येत असतात. तर आज अनंत चतुर्दशी दिवशी विसर्जन मिरवणुकीला मंडई चौकातून सुरुवात होते. मानाचा पहिला कसबा गणपतीची पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) आणि उपसभापती नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांनी आरती केल्यानंतर विसर्जन मिरवणुकीला (Pune Ganpati Visarjan Miravnuk 2023) सुरूवात झाली. गणपती बाप्पा मोरया… मंगलमूर्ती मोरया… पुढच्या वर्षी लवकर या… हा एकच जयघोष पाहण्यास मिळाला.

यावेळी पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार (IAS Vikram Kumar), पुणे शहर पोलीस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar), पोलीस सह आयुक्त संदीप कर्णिक (IPS Sandeep Karnik), माजी महापौर मुरलीधर मोहोळ (Former Mayor Muralidhar Mohol), कसबा गणपती मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत शेटे (Srikanth Shete) यांच्यासह हजारो भाविक उपस्थित होते.

आज सकाळी मंडई चौक येथे मानाचा पहिला कसबा गणपतीची 10.15 मिनिटांनी झाल्यानंतर बेलबाग चौकातून अलका टॉकीज चौकाच्या दिशेने मिरवणुक (Pune Ganpati Visarjan Miravnuk 2023) मार्गस्थ झाली. विसर्जन मिरवणुकीमध्ये बँड, ढोल ताशा पथक सहभागी झाले होते. पुण्यातील बेलबाग चौकात मोठ्या जल्लोषात ढोल ताशा वादनाला सुरुवात झाली आहे. अनेक ढोल ताशा पथक हळूहळू या चौकात दाखल होत आहे. हे वादन पाहण्यासाठी तरुणांनी तुफान गर्दी केली आहे.

पुण्यातील मानाचे गणपती

  1. कसबा गणपती (हे पुण्याचे ग्रामदैवत आहे)
  2. तांबडी जोगेश्वरी गणपती
  3. गुरुजी तालीम गणपती
  4. तुळशीबाग गणपती
  5. केसरीवाडा गणपती

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maharashtra Pollution Department Notice To Baramati Agro | मध्यरात्री 2 वाजता रोहित पवारांच्या कंपनीवर मोठी कारवाई ! बारामती अ‍ॅग्रो 72 तासात बंद करण्याची सूचना; दोन बड्या नेत्यांवर आरोप

Pune ACB Trap News | कॉन्ट्रॅक्टर कडून लाच घेताना तळेगाव दाभाडे नगरपरिषदेतील लेखापाल अँन्टी करप्शनच्या जाळ्यात