पुण्याच्या वेदांगीचा अटकेपार झेंडा ; सायकलने जगप्रदक्षिणा करण्याचा विक्रम 

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – पुण्याच्या वेदांगी कुलकर्णीने १५९ दिवसांत सायकलने जगप्रदक्षिणा करण्याचा विक्रम नावावर केला आहे. तिला इटलीच्या पाऊलो जिंअँनोट्टीने २०१४ मध्ये नोंदवलेला १४४ दिवसांचा विक्रम मोडता आला नाही. मात्र, वेदांगी सर्वात जगप्रदक्षिणा करणारी आशियाई सायकलपटू ठरली आहे. २९००० किलोमीटरचे अंतर पार करून ती कोलकाता येथे पोहोचली आहे. वेदांगीने ऑस्ट्रेलियाच्या पर्थ येथून या प्रवासाला सुरुवात केली होती. त्यामुळे वेदांगीने केवळ पुण्याचेच नाही तर देशाचे नाव जगभर उंचावले आहे.

वेदांगी ब्रिटनच्या बॉउर्नेमाउथ युनिव्हर्सिटीत स्पोर्ट्स मॅनेजमेंटचा अभ्यास करत आहे. हा विक्रम करण्यासाठी तिने दोन वर्ष सराव केला. वेदांगीचा हा प्रवास प्रचंड खडतर होता. कॅनडात तिच्या मागे अस्वल लागला होता. त्यातच रुसमध्ये बर्फामध्येही ती अडकली होती. स्पेनमध्ये तिच्यावर चाकू हल्लाही झाल्याचे वृत्त आहे.वेदांगीने ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, कॅनडा, आइसलँड, पोर्तुगाल, स्पेन, फ्रान्स, बेल्जियम, जर्मनी, डेन्मार्क, स्वीडन, फिनलँड आणि रुस येथून भारत असा प्रवास केला.

आताच्या पृथ्वी प्रदक्षिणेसाठी वेदांगीने मागील २ वर्षांपासून तयारी केली होती. या जगप्रवासात तिला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. मात्र त्यावर मात करत तिने अवट्घ्या २० व्या वर्षी आपली ही सफर पूर्ण केली. वेदांगीने जुलै महिन्यात पश्चिम ऑस्ट्रेलियाची राजधानी असलेल्या पर्थ येथून आपल्या या मोहिमेची सुरुवात केली होती. तर ऑस्ट्रेलियातील दुसऱ्या एका शहरात तिने या मोहिमेचा शेवट केला. वेदांगी दिवसाला ३०० किमी सायकल चालवायची. या काळात तिला बरेच चांगले वाईट अणुअभाव आले.