पुणे : अडल्ट बेवसाईटवरुन तरुणीची बदनामी

ADV

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

फेसबुकवरील मित्राकडून पैसे उसने घेतलेल्या पुण्यातील तरुणीची फ्रि चॅट नाऊ या अडल्ट वेबसाईटवरून बदनामी करण्यात आल्याचा प्रकार पुण्यात उघडकीस आला आहे. याप्रकरणी मुंबईतील एका युवकावर वानवडी पोलीस ठाण्यात आयटी अॅक्ट कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार जुन २०१७ ते रविवार (दि.२) या दरम्यान फातिमानगर येथे घडला.
[amazon_link asins=’B00MEHFIPY,B0744L6WG5′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’a43067e5-af6a-11e8-9ae0-25254b191d13′]

ADV

औंकार शंकर चौधरी (रा. कृष्णा अपार्टमेंट, कल्याण (पु), मुंबई असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या युवकाचे नाव आहे. याप्रकरणी वानवडी येथील एका २४ वर्षीय तरुणीने वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

जाहिरात

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणी आणि आरोपी यांची फेसबुकद्वारे मैत्री झाली. तरुणीला पैशांची गरज असल्याने तीने फेसबुकवरील मित्र चौधरी याच्याकडे पैशांची मागणी केली. चौधरी याने तरुणीला २५ हजार रुपये उसने दिले त्याबदल्यात तरुणीने सोन्याची चेन त्याला दिली. काही दिवसांनी तरुणीने पैसे परत करुन सोन्याची चेन परत मागितली. त्यावेळी चौधरी याने तरुणीला शिवीगाळ करुन जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच तरुणीच्या मेलवर अश्लिल फोटो पाठवले. दरम्यान, चौधरी याने तरुणीचा मोबाईल नंबर फ्रि चॅट नाऊ या अडल्ट वेबसाईटवर लोड करुन तीची बदनामी केली. तरुणीने याची फिर्याद वानवडी पोलीस ठाण्यात केली. पोलिसांनी आरोपी ओंकार चौधरी याचेवर आयटी अॅक्ट नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास वानवडी पोलीस करीत आहेत.

जाहिरात