Pune Hadapsar Crime | पुणे : हॉर्न वाजवल्याने लाकडी दांडक्याने मारहाण, चौघांवर FIR

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Hadapsar Crime | मॉलच्या प्रवेशद्वारावर दुचाकी घेऊन उभ्या असलेल्या चौघांना गाडीचा हॉर्न वाजवून बाजूला होण्यास सांगितले. याचा राग आल्याने चार जणांनी एका व्यक्तीला हाताने व काठीने बेदम मारहाण करुन जखमी केले. हा प्रकार मंगळवारी (दि.19) मार्च रोजी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास हडपसर येथील अ‍ॅमनोरा मॉलच्या (Amanora Park Pune) गेटसमोर घडला.

याबाबत धनंजय पंडीतराव सावंत (वय-44 रा. अ‍ॅडरीनो, अ‍ॅमनोरा, हडपसर) यांनी गुरुवारी (दि.21) हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. यावरुन दोन दुचाकीवर बसलेल्या चार जणांवर आयपीसी 324, 323, 504, 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी हे सीझन मॉल येथून त्यांची चारचाकी गाडीने अ‍ॅमनोरा मॉलमध्ये जात होते. त्यावेळी मॉलच्या प्रवेशद्वारासमोर आरोपी त्यांच्या दुचाकीवर बसले होते. त्यामुळे फिर्यादी यांनी हॉर्न वाजवून त्यांना बाजूला होण्यास सांगितले. याचा राग आल्याने आरोपींनी फिर्यादी यांना शिवीगाळ करुन हाताने व लाकडी काठीने मारहाण केली. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

शिवीगाळ करून तरुणाला मारहाण

कोंढवा (Kondhwa News) : मित्रासोबत गप्पा मारत असलेल्या तरुणाला काहीएक कारण नसताना लाकडी दांडक्याने
व लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन जखमी केले. हा प्रकार बुधवारी (दि.20) कोंढवा खुर्द येथील अश्रफनगर येथे घडला.
याबाबत युसुफ मोहंमद युसुफ मोहंमद खान (वय-18 रा. कोंढवा) याने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली.
यावरुन अरबाज उर्फ भंगार (वय-20), रेहान उर्फ ऑगी (वय-19), जुबेर उर्फ डिग्गी (वय-18), हमिद
(सर्व रा. गौसुलवाला मजिद जवळ, अश्रफनगर, कोंढवा) यांच्यावर आयपीसी 325, 324,323, 504, 506, 34 नुसार
गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Accident News | भरधाव कार उलटल्याने महाविद्यालयीन तरुणाचा मृत्यू, मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावरील घटना

Rohit Pawar On Maharashtra Mahayuti Govt | अटी शर्ती बदलून सत्ताधाऱ्यांनी आदिवासी आणि मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या दूध व पोषण आहार पुरवठ्यामध्ये 400 कोटीं रुपयांची दलाली खाल्ली; आमदार रोहित पवार यांनी पुराव्यानिशी केलेल्या आरोपांनी खळबळ

Pune Hadapsar Crime | पुणे : लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार, आरोपी गजाआड