Pune Hadapsar Crime | पुणे : चॉकलेच्या बहाण्याने चार वर्षाच्या मुलीसोबत लैंगिक अत्याचार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Hadapsar Crime | घरासमोर खेळत असलेल्या चार वर्षाच्या अल्पवयीन मुलीला चॉकलेट देण्याच्या बहाण्याने नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार (Sexual Assault) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना कात्रज परिसरात बुधवारी (दि.3) दुपारी एकच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी (Hadapsar Police Station) एका तरुणावर गुन्हा दाखल केला आहे. (Pune Hadapsar Crime)

याबाबत पीडित मुलीच्या 27 वर्षीय आईने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली आहे. यावरुन 20 ते 22 वर्षीय अनोळखी तरुणावर आयपीसी 354 (अ), 363, 366 (अ), 323, 506 सह पोक्सो अॅक्ट नुसार (POCSO Act) गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची चार वर्षाची मुलगी वस्तीमधील लहान मुलांसोबत खेळत होती. आरोपीने मुलीला चॉकलेट देतो असे म्हणून तिला शेजारी असलेल्या एका पत्र्याच्या शेडमध्ये घेऊन गेला.
त्याठीकाणी मुलीसोबत अश्लील वर्तन केले. मुलगी रडू लागल्यानंतर तिला मारहाण केली.
तसेच रडली तर कापून टाकीन अशी धमकी दिली.
पत्र्याच्या शेडमधून मुलीचा रडण्याचा आवाज आल्याने परिसरात राहणाऱ्या तरुणाने शेडमध्ये गेला.
तरुणाला पाहताच आरोपीने त्याला धक्का मारून पळून गेला. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Wagholi Crime | वाघोली येथील बिवरी गावात दरोडा, चाकूचा धाक दाखवून दरोडेखोरांनी लुटला 16 लाखांचा ऐवज

Pune Water Crisis-Traffic Issue | आम्हाला प्यायला पाणी आणि कोंडीमुक्त रस्ते कसे देणार? लोकसंख्येच्या विस्फोटामुळे पुण्याच्या पाण्याचा आणि वाहतुकीचा प्रश्न अतिगंभीरतेच्या दिशेने

Pimpri Murder Case | पिंपरी : मित्राचा खून करुन फरार झालेल्या आरोपीला मध्य प्रदेशातून अटक