Pune Hadapsar Iftar Party | हडपसर येथील शिवसमर्थ संस्थेच्या वतीने सातववाडी परिसरातील विद्यार्थ्यांच्यासाठी रोजे इफ्तार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Hadapsar Iftar Party | संयम, त्याग, दया, क्षमा, शांती,चांगुलपणा, प्रामाणिकपणा याची शिकवण सर्वच धर्मग्रंथात दिलेली आहे. त्याचे आचरण करून बलशाली भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी भावी पिढीला चांगले संस्कार देणे हे आपले कर्तव्य आहे. आपापसातल्या मतभेदांची दरी कमी करून परस्परांमध्ये स्नेहभाव, सद्भावना वाढवणारा हा रमजानचा पवित्र महिना आहे. यानिमित्त विविध ठिकाणी इफ्तार समारंभ आयोजित केले जातात. यातून एकमेकांमधील स्नेहभाव वृद्धिंगत होतो. अशा समारंभात सर्व धर्मीयांचा सहभाग हे प्रगत राष्ट्राचे व सुदृढ समाजाचे लक्षण आहे. असे प्रतिपादन पोलीस उपायुक्त शशिकांत बोराटे (DCP Shashikant Borate) यांनी केले. (Pune Hadapsar Iftar Party)

 

हडपसर येथील शिवसमर्थ संस्थेच्या वतीने सातववाडी परिसरातील शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्यासाठी आयोजित ” रोजे इफ्तार ” कार्यक्रमानिमित्त ते बोलत होते. (Pune Hadapsar Iftar Party)

 

यावेळी पोलीस निरीक्षक दिगंबर शिंदे, उपनिरीक्षक सोमनाथ पडसाळकर, हडपसर गुरुद्वाराचे बच्चूसिंग टाक, ग्यानी चत्तरसिंग, आलमगीर मज्जिदचे मेहबूब शेख, उन्नती नगर गणेश मंडळाचे युवराज मोहरे, हडपसर ख्रिश्चन समाज समन्वयक अमित मेहंदळे, मानवी युवा संस्थेचे दिगंबर माने, डॉ. शंतनू जगदाळे, तुषार पायगुडे, सुषमा पिसाळ, कार्यक्रमाचे आयोजक शिवसमर्थ संस्थेच्या अध्यक्षा मनीषा वाघमारे, सुरज अग्रवाल, पार्थ वाघमारे, सिद्धेश चिकबेनुर आदी मान्यवर उपस्थित होते.

 

या ” रोजे इफ्तार ” कार्यक्रमात ८० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.
यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाची सुरुवात सद्भावना प्रार्थनेने केली तर सांगता विश्व कल्याणकारी पसायदानाने झाली.
यावेळी सर्व धर्मीय विद्यार्थी व नागरिक उपस्थित होते.
उपस्थित मान्यवरांनी रमजान या पवित्र महिन्याचे महत्व व उपासना या विषयावर मार्गदर्शन केले.
रोजे इफ्तार या उपक्रमाचे हे सहावे वर्ष आहे. सौभाग्यवती मनीषा वाघमारे संस्थेची अध्यक्ष आहेत.

 

Web Title :- Pune Hadapsar Iftar Party | roje Iftar for the students of Satavwadi area on behalf of Shiv Samarth Sanstha at Hadapsar

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Dsk Vishwa Water Problem – MP Supriya Sule | डीएसके विश्वचा पाणीप्रश्न लवकरच सुटणार

MP Udayanraje Bhosale | ‘…तर मी आव्हानांना भीक घालत नाही’, उदयनराजेंचा अजित पवारांना टोला (व्हिडिओ)

RAJIV Gandhi e -Learning School Pune | राजीव गांधी ई-लर्निंग स्कुलला ‘ISO 9001’ मानांकन