Pune News : हैवान बनला नवरा ! माहेरुन पैसे आणले नाहीत, पत्निच्या गुप्तांगात घातला रॉड

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुण्यासारख्या सांस्कृतिक शहरामध्ये महिलांवर अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होताना पहायला मिळत आहे. माहेरहून पैसे आणत नसल्याच्या कारणावरून एका नराधम पतीने आपल्याच पत्नीच्या गुप्तांगात रॉड घालून तिला गंभीर जखमी केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. ही घटना पुण्यातील बोपोडी परिसरात घडली आहे.

याप्रकरणी पोलिसांनी इम्तियाज चौधरी, सईद चौधरी, अश्फाक चौधरी, जाकीर चौधरी, मकायश चौधरी, शमशुद्दीन (सर्व रा. खडकी) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी 21 वर्षीय पीडित महिलेने खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या घटनेतील पीडित महिलेच्या सासरच्या लोकांनी लग्नानंतर माहेराहून पैसे आणावेत यासाठी तिचा छळ करण्यास सुरुवात केली. त्याशिवाय पतीने पत्नीसोबत अनैसर्गिक संभोग करुन तिच्या गुप्तांगात केबल रॉड घालून गंभीर जखमी केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडीत फिर्यादी महिला आणि इम्तियाज यांचे काही महिन्यांपूर्व लग्न झाले आहे. लग्नानंतर त्याने आणि इतर सासरच्या लोकांनी पैशांसाठी पीडीत महिलेचा छळ करण्यास सुरुवात केली. माहेरहून एक लाख रुपये आणण्यासाठी पती इम्तियाजने तिच्याकडे तगादा लावला. तसेच तिच्यासोबत अनैसर्गिक संभोग केला. त्यानंतर तिच्या गुप्तांगात केबल रॉड घालून जखमी केले. पीडीत महिलेने दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास खडकी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अमोल भोसले करीत आहेत.