पुणे शिक्षक मतदारसंघात ‘महाविकास’चे प्रा. आसगावकर यांची विजयाकडे वाटचाल

पुणे : पुणे शिक्षक मतदारसंघात महाविकास आघाडीचे प्रा. आसगावकर यांनी विजयाकडे वाटचाल सुरु केली आहे. मात्र, पहिल्या पसंतीच्या २४ हजार ११४ मतांचा कोटा पूर्ण न केल्याने आता पुढील पसंतीची मते मोजण्यास सुरुवात झाली आहे. त्यात १२ व्या राऊंडअखेर प्रा. जयंत आसगावकर यांना १६ हजार ९६६ मते मिळाली आहेत. भाजपा पुरस्कृत दत्तात्रय सावंत यांना ११ हजार ९० मते मिळाली आहेत. विद्यमान आमदार जितेंद्र पवार यांना ५ हजार ८३१ मते मिळाली आहेत. या मतदारसंघात एकूण ३५ उमेदवार आहेत. त्यामुळे आता पुढील पसंतीची मते मोजण्यास सुरुवात झाली आहे. मात्र, अनेकांनी पुढील पसंतीची मतेच दिली नसल्याने कोणताही उमेदवार पहिल्या पसंतीच्या मताचा कोटा पूर्ण करु शकणार नाही असे सध्याचे चित्र आहे. त्यामुळे प्रत्यक्ष निकाल जाहीर होण्यास खूप उशीर होण्याची शक्यता आहे.