Pune Job Fairs 2023 | पुणे : विभागीय महारोजगार मेळाव्याचे 21 एप्रिल रोजी आयोजन

पुणे : Pune Job Fairs 2023 | क्रांतीसूर्य महात्मा जोतिराव फुले (Mahatma Jyotiba Phule) व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त (Ambedkar Jayanti) विचार प्रबोधन वर्ष २०२३ च्या अनुषंगाने जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उदयोजकता मार्गदर्शन केंद्र, पिंपरी चिंचवड महानगरपालिका Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) व बानाई संस्था पुणे (Banai Sansath Pune) यांच्या संयुक्त विद्यमाने २१ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता औद्योगिक प्रशिक्षण संस्था, मोरवाडी पिंपरी (Morewadi Pimpri) येथे पंडीत दिनदयाल उपाध्याय महारोजगार मेळाव्याचे (Pandit Din Dayal Upadhyay Mega Job Fair) आयोजन करण्यात आले आहे. (Pune Job Fairs 2023)

पुणे व पिंपरी चिंचवड औद्योगिक क्षेत्रामधील खाजगी उद्योजक सहभागी होणार असून त्यांच्याकडून सुमारे 2 हजारपेक्षा जास्त रिक्तपदे भरण्यात येणार आहे. या पदांकरीता किमान इयत्ता १० वी, १२ वी तसेच कोणत्याही शाखेतील पदवीधर, पदव्युत्तर पदवी, आयटीआय, पदविकाधारक, अभियांत्रिकी पदवी, एमबीए, बीसीए उत्तीर्ण आदी पात्रताधारक स्त्री-पुरुष उमेदवार पात्र असणार आहेत.

इच्छुक उमेदवारांनी http://www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने
आपले पसंतीक्रम नोंदविणे आवश्यक आहे. मेळाव्याच्या दिवशी प्रत्यक्ष मुलाखतीला येताना उमेदवारांनी आपली
सर्व शैक्षणिक कागदपत्रे, पारपत्र आकाराची छायाचित्रे, आवश्यकतेनुसार अर्जाच्या व आधारकार्डच्या छायांकित
प्रती सोबत आणाव्यात. या संधीचा लाभ जास्तीत जास्त उमेदवारांनी घ्यावा, असे आवाहन कौशल्य विकास,
रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे प्र. सहायक आयुक्त सागर मोहिते (Sagar Mohite) यांनी केले आहे.

Web Title :- Pune Job Fairs 2023 | Pune: Pandit Din Dayal Upadhyay Mega Job Fair on 21st April

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

 

Appasaheb Dharmadhikari | उष्माघाताने श्री सेवकांचा झालेला मृत्यू माझ्यासाठी अत्यंत क्लेशदायक, याचे राजकारण होऊ नये – आप्पासाहेब धर्माधिकारी

Maharashtra Political News | ‘अजितदादाच करेक्ट कार्यक्रम करतील’, शिवसेना मंत्र्यांचे महत्त्वाचं विधान