Maharashtra Political News | ‘अजितदादाच करेक्ट कार्यक्रम करतील’, शिवसेना मंत्र्यांचे महत्त्वाचं विधान

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Political News | महाराष्ट्राच्या राजकारणात लवकरच मोठा राजकीय भूकंप होणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) फुटीच्या उंबरठ्यावर असून अजित पवार (Ajit Pawar) नाराज असून ते लवकरच भाजपसोबत (BJP) जाणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. त्यातच अजित पवार यांनी सोमवारी (Maharashtra Political News) पुण्यातील सर्व कार्यक्रम अचानक रद्द केले. यावर नेत्यांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत असताना शिवसेना शिंदे गटाचे नेते (Shiv Sena Shinde Group) आणि मंत्री उदय सामंत (Minister Uday Samant) यांनी सूचक विधान केलं आहे.

 

उदय सामंत म्हणाले, शक्यता जर सत्यात उतरली तर आम्हाला सगळ्यांना आनंद आहे. अजितदादांची काम करायची वेगळी पद्धत आहे. मी स्वत: त्यांच्या सोबत 20 वर्ष काम केले आहे. जर करेक्ट कार्य़क्रम करत असताना माझी काही गरज लागली तर मी करेन, पण कार्यक्रम तेच करतील. पण आम्हाला सगळ्यांना आनंद असेल, असं सूचक विधाने सामंत यांनी केलं आहे.

 

शरद पवारांच्या परवानगिनेच अजित पवार…- रवी राणा

 

सध्या राज्यामध्ये सत्तांतराच्या चर्चा होत असताना शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांच्या परवानगीनेच अजित पवार भाजपमध्ये जातील (Maharashtra Political News) असा गौप्यस्फोट भाजप समर्थित युवा स्वाभिमान पक्षाचे (Yuva Swabhiman Party) आमदार रवी राणा (MLA Ravi Rana) यांनी केला आहे. शरद पवार आणि मोदी यांचे काय संबंध आहेत हे महाराष्ट्राला माहिती आहे, दोघेही एकमेकांचा सन्मान करतात. जेव्हा नरेंद्र मोदी (PM Narendra Modi), अमित शाह (Amit Shah) हिरवा कंदील देतील, तेव्हा अजित पवार हे भाजप सोबत जातील. देशाचे पंतप्रधान व गृहमंत्री यांचा हिरवा कंदील केव्हाही येऊ शकतो. तेव्हा अजित पवार पुन्हा नॉट रीचेबल होतील असे सुद्धा त्यांनी यावेळी सांगितले.

 

Web Title :-  Maharashtra Political News | only-ajit-pawar-can-take-the-decision-says-shiv-sena-leader-uday-samant

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Appasaheb Dharmadhikari | उष्माघाताने श्री सेवकांचा झालेला मृत्यू माझ्यासाठी अत्यंत क्लेशदायक, याचे राजकारण होऊ नये – आप्पासाहेब धर्माधिकारी

Bombay High Court | मुंबई हायकोर्टाचा ठाकरे गटाला दणका तर शिंदे सरकारला दिलासा; BMC मध्ये 227 वॉर्ड राहणार

Black-Yellow Taxis Fares Hike In Pune | पुणे जिल्ह्यातील काळ्या- पिवळ्या टॅक्सीच्या भाडेदरात वाढ, जाणून घ्या सविस्तर

TDM Marathi Movie Trailer | ‘एकदम कडक ट्रेलर, टीडीएम सुपरहिट होणार…’, टीडीएमच्या ट्रेलरला प्रेक्षकांकडून भरभरून मिळतोय प्रतिसाद

NCP Chief Sharad Pawar | ‘… भाजप सरकारला सत्तेत राहण्याचा अधिकार नाही’, सत्यपाल मलिकांनी पुलवामा हल्लाबाबत केलेल्या विधानावर शरद पवारांचा हल्लाबोल