Pune Junnar News | रस्त्याने जाताना डोक्यात पडले झाड; तरुणाच्या डोक्यावर परिणाम होऊन होतोय विस्मरणाचा त्रास

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Pune Junnar News | अनेकदा वेगवेगळ्या कारणावरुन झाडे तोडली जातात. अशावेळी रस्त्यावरुन जाणार्‍या वाहनांवर ती पडू नये, म्हणून वाहतूक थांबविली जाते. रस्त्याने मोटारसायकलवरुन जाताना डोक्यात झाड पडल्याने त्यात तरुण गंभीर जखमी होऊन बेशुद्ध झाला. मेंदुला मार लागल्याने त्यांना विस्मरणाचा त्रास होऊ लागला आहे.

याबाबत सुनिल दगडु शेरकर (वय ५१, रा. शिरोली बुता, जुन्नर) यांनी जुन्नर पोलिसांकडे (Junnar Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ६८/२४) दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी भागुजी विष्णु हाडवळे (रा. शिरोलीबुता, जुन्नर) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुनिल शेरकर हे विघ्नहर सहकारी साखर कारखान्यात नोकरीला आहेत.
ते नेहमीप्रमाणे विघ्नहर कारखान्यात ३ जानेवारी रोजी सकाळी कामावर गेले होते.
तेथून ते जुन्नरला जाण्यासाठी मोटारसायकलवरुन शिरोली येथील अंजिक्य पेट्रोल पंपाजवळ आल्यावर तेथून जाताना अचानक त्यांच्या अंगावर झाड पडले. अंगावर झाड पडल्याने ते मोटारसायकलसह खाली पडले. झाड तोडणारा भागुजी हाडवळे हा तोडलेले झाड अंगावर पडलेले पाहून तेथून निघून गेला. शेरकर यांच्या अंगावर झाड पडल्याने त्यांच्या डोक्याला, पाठीला मार लागला. ते बेशुद्ध पडले. लोकांनी त्यांना मंचर येथील लोकमान्य हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तेथे त्यांच्यावर उपचार सुरु होते. डोक्याला जास्त मार लागल्याने त्यात मेंदुलाही मार लागला आहे. त्यामुळे त्यांना विस्मरणाचा त्रास होत आहे. त्यामुळे आता त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली आहे. पोलीस उपनिरीक्षक दिलीप पवार (PSI Dilip Pawar) तपास करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Sanjay Raut-Sharad Pawar-PM Narendra Modi | पवारांनी राजकारणापलिकडे जाऊन केलेली मदत मोदींनीच वारंवार सांगितली : संजय राऊत

Pune Sinhagad Road Crime | शेअर बाजार मार्गदर्शकावर शस्त्राने वार, सिंहगड रस्ता परिसरातील प्रकार

Pune PMC News | बायोमायनिंग करून मोकळया केलेल्या जागेवर पुन्हा ‘रिजेक्ट’ कचर्‍याच्या ‘लँडिफिलिंग’ची निविदा

Hemant Jogdeo | ज्येष्ठ क्रीडा पत्रकार हेमंत जोगदेव यांचे निधन

Pune Crime News | विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या, तिघांवर गुन्हा दाखल