Pune Sinhagad Road Crime | शेअर बाजार मार्गदर्शकावर शस्त्राने वार, सिंहगड रस्ता परिसरातील प्रकार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Sinhagad Road Crime | शेअर बाजार संदर्भात गाइड करणाऱ्या क्लासचालकावर सिंहगड रस्ता परिसरात तीक्ष्ण शस्त्राने सपासप वार करुन गंभीर जखमी केले (Attempt To Murder). याप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, या घटनेमागील कारण समजू शकले नाही. हा प्रकार वडगाव बुद्रुकमधील कीर्तीनगर परिसरात घडला आहे. (Pune Sinhagad Road Crime)

नितांत नामदेव गायकवाड (वय-26 रा. वडगाव बुद्रुक, सिंहगड रस्ता) असे जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी तिघांविरोधात सिंहगड रोड पोलीस ठाण्यात (Sinhagad Road Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गायकवाड यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. गायकवाड हे वडगाव बुद्रुक परिसरात शेअर बाजारासंदर्भात मार्गदर्शन करणारे क्लास घेतात.

नितांत गायकवाड रात्री अकराच्या सुमारास घरी निघाले होते. वडगाव बुद्रुकमधील कीर्तीनगर परिसरात दुचाकीवरुन आलेल्या तिघांनी गायकवाड यांना अडवले. त्यांच्यावर शस्त्राने वार केले. यामध्ये गायकवाड यांच्या हाताला जखम झाली. त्यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे कारण समजू शकले नाही. गायकवाड यांच्यावर हल्ला केल्यानंतर आरोपी पळून गेले आहेत. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुरेश जायभाय (PSI
Suresh Jaybhay) करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune PMC News | बायोमायनिंग करून मोकळया केलेल्या जागेवर पुन्हा ‘रिजेक्ट’ कचर्‍याच्या ‘लँडिफिलिंग’ची निविदा

Hemant Jogdeo | ज्येष्ठ क्रीडा पत्रकार हेमंत जोगदेव यांचे निधन

Pune Crime News | विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या, तिघांवर गुन्हा दाखल

Maharashtra State Excise Department | लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई ! अवैध दारूसह सुमारे 2 कोटी 82 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

Pimpri Chinchwad Police | पिंपरी चिंचवड पोलिसांचा पुढाकार, दिशा भरकटलेली बालके खेळणार ‘स्लम सॉकर’ राष्ट्रीय स्तरीय फुटबॉल स्पर्धेत