Pune Kasba Peth Bypoll Election | कसब्यात सर्वाधिक पैसे खर्च करण्यात रवींद्र धंगेकर आघाडीवर, कोणत्या उमेदवाराने किती केला खर्च?

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Kasba Peth Bypoll Election | मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलेल्या कसबा पेठ पोटनिवडणुकीसाठी आज मतदानाला सुरुवात झाली आहे. कसब्याची पोटनिवडणूक पहिल्यापासून चर्चेचा विषय ठरली आहे. भाजपने (BJP) ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. भाजप आणि महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) दिग्गज नेत्यांना प्रचारात उतरवल्याने या निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. निवडणुकीच्या (Pune Kasba Peth Bypoll Election) प्रचारासाठी लाखो रुपयांची उधळण करण्यात आली. निवडणूक म्हटले की नुसता पैशांचा पाऊस असतो. मत्र कसब्यात उमेदवारांनी खूपच कमी पैसे खर्च केल्याचं समोर आलं असलं तरी काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर (Congress Candidate Ravindra Dhangekar) हे पैसे खर्च करण्यात आघाडीवर असल्याचे पाहायला मिळत आहे.

रवींद्र धंगेकर यांनी भाजपने पैसे वाटप केल्याचा आरोप करत उपोषणाचा मार्ग अवलंबला होता. यावरुन भाजप आणि महाविकास आघाडीकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्यात आले. मात्र दोन्ही नेत्यांनी केलेल्या खर्च पाहिला तर या दोघांनी 20 लाख 54 हजार 205 रुपये खर्च केले आहेत. यामध्ये रवींद्र धंगेकर यांनी 11 लाख 60 हजार 029 रुपये तर भाजपचे उमेदवार हेमंत रासने (Hemant Rasane) यांनी 8 लाख 94 हजार 176 रुपये खर्च केले आहेत. निवडणूक (Pune Kasba Peth Bypoll Election) निरीक्षक उमेदवार आणि निवडणूक अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत प्रत्येक उमेदवाराच्या खर्चाच्या पडताळणीचे तीन टप्पे घेत आहेत. मतदारसंघातील प्रचार खर्चाची जबाबदारी असलेल्या नंदा हंडाळ यांच्या म्हणण्यानुसार, निवडणूक निरीक्षकांच्या सूचनेनुसार पडताळणी पूर्ण झाली आहे.

कोणत्या उमेदवाराने किती खर्च केला?

1. रवींद्र धंगेकर, काँग्रेस -11 लाख 60 हजार 029
2. हेमंत रासणे, भाजप – 8 लाख 94 हजार 176
3. आनंद दवे, अपक्ष – 1 लाख 45 हजार 719
4. बलजीत सिंह कोचर, प्ररिपा – 78 हजार
5. संतोष चौधरी, अपक्ष – 75 हजार 889
6. तुकाराम डफळ, सैसपा – 29 हजार 177
7. रवींद्र वेदपाठक, रामपा – 41 हजार 020
8. अजित इंगळे, अपक्ष – 5 हजार 353
9. अनिल हातगळे, अपक्ष – 26 हजार 309
10. अभिजित आवाडे-बिचुकले, अपक्ष – 5 हजार 300
11. अमोल तुजारे, अपक्ष, – 11 हजार 333
12. खिसाल जाफरी, अपक्ष, – 37 हजार 500
13. चंद्रकांत मोटे, अपक्ष – 5 हजार 656
14. रियाझ सय्यद, अपक्ष – 28 हजार
15. सुरेशकुमार ओसवाल, अपक्ष – 30 हजार 270
16. हुसेन शेख, अपक्ष – 23 हजार 801

Web Title :-  Pune Kasba Peth Bypoll Election | pune bypoll election how much expenditure by which candidate in kasab for campaigning