Pune Kasba Peth Chinchwad Bypoll Election | चिंचवडमध्ये मतदान केंद्रावर राडा, तर पुण्यात महिला नेत्याकडून गोपनियतेचा भंग

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Kasba Peth Chinchwad Bypoll Election | पुण्यात कसबा आणि चिंचवड मदतारसंघात पोटनिवडणुकीसाठी आज मतदान (Voting) सुरु झाले आहे. दोन्ही ठिकाणची निवडणूक भाजपसाठी (BJP) प्रतिष्ठेची आहे. प्रचारावेळी तापलेल्या राजकीय वातावरणाचे पडसाद मतदानादिवशी पाहायला मिळत आहेत. चिंचवडमध्ये सकाळी अपक्ष उमेदवाराच्या समर्थकांत आणि भाजपच्या माजी नगरसेवकांत हाणामारीचा प्रकार घडला आहे. तर पुण्यात मतदान (Pune Kasba Peth Chinchwad Bypoll Election) करताना राष्ट्रवादीच्या (NCP) महिला नेत्यानं गोपनीयतेचा भंग (Breach of Privacy) केल्याचा आरोप केला जात आहे.

चिंचवडमध्ये मतदानावेळी पिंपळे गुरव मतदान केंद्रावर राडा झाला. सागर अंघोळकर आणि राहुल कलाटे (Rahul Kalate) यांच्या समर्थकांमध्ये हाणामारी झाली. संबंधित प्रकाराबाबत तक्रार आल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल आणि शहरात सुरळीत मतदान सुरु असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.

पुण्यात गोपनियतेचा भंग

कसबा मतदारसंघातील पोटनिवडणूक मतदानावेळी राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील (Rupali Thombre Patil) यांनी मतदानाचा हक्क बजावताना ईव्हीएम मशीनचा (EVM Machines) फोटो काढून गोपनीयतेचा भंग केल्याचा आरोप केला आहे. हा फोटो सध्या व्हायरल होत असून यामध्ये कोणाला मतदान केले हे स्पष्ट दिसत आहे. या प्रकरणाची निवडणूक आयोग दखल घेऊन कारवाई करणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

https://www.facebook.com/photo?fbid=746308676865875&set=a.534226818074063

 

रुपाली ठोंबरे पाटील यांनी आरोप फेटाळले

रुपाली ठोंबरे पाटील यांनी त्यांच्यावर करण्यात आलेले आरोप फेटाळून लावले आहे.
मी अद्याप मतदानच केले नाही तर आचार संहिता गोपनियतेचा भंग कसा होईल?
असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. तर दुसरीकडे रुपाली ठोंबरे पाटील यांच्यावर गुन्हा (FIR) दाखल
करण्याची मागणी भाजपचे धनंजय जाधव (Dhananjay Jadhav) यांनी केली आहे.

Web Title :-  Pune Kasba Peth Chinchwad Bypoll Election | ncp leader rupali patil accused of breach of privacy while voting in kasba by election