Pune Kasba Peth Bypoll Election Result | कसबा भाजपच्या हातून निसटला, काँग्रेसने गुलाल उधळला; जाणून घ्या कोणाला किती मते पडली

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Kasba Peth Bypoll Election Result | भाजप आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या कसबा पेठ विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक घेण्यात आली. या निवडणुकीत भाजप (BJP) आणि महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) थेट लढत झाली. भाजपने हेमंत रासने (Hemant Rasane) तर महाविकास आघाडीने रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांना निवडणूकीच्या रिंगणात उतरवले होते. दोन्ही पक्षांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. त्यामुळे पोटनिवडणुकीत (Pune Kasba Peth Bypoll Election Result) कोण बाजी मारणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. अखेर काँग्रेसचे (Congress) रवींद्र धंगेकर भाजपच्या उमेदवाराचा 10 हजार 950 मतांनी पराभव केला. काँग्रेसने तब्बल 28 वर्षांनी ही जागा आपल्या ताब्यात घेतली आहे.

कसब्यात भाजपविरोधात नाराजी पाहता भाजपच्या अनेक दिग्गज नेत्यांनी कसब्यात तळ ठोकला होता. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), गिरिष महाजन (Girish Mahajan), पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil), भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule), गटनेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) याशिवाय पुण्यातील आमदार प्रचारात उतरले होते. एवढंच नाही तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी देखील रोड शो केला होता.

कसबा विधानसभा मतदार संघामध्ये एकूण 2 लाख 75 हजार 679 मतदार आहेत. त्यापैकी 1 लाख 38 हजार 403 जणांनी मतदानाचा हक्क बजावला. कसबा पोटनिवडणुकीत 16 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. या निवडणुकीत काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांना 73 हजार 194 मते मिळाली तर भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांना 62 हजार 244 मते पडली. पोटनिवडणुकीत 1397 जणांनी नोटाला मतदान केले.

कोणत्या उमेदवाराला किती मतं मिळाली?

1. रवींद्र हेमराज धंगेकर (इंडियन नॅशनल काँग्रेस-Indian National Congress) – 73194
2. हेमंत नारायण रासणे (भारतीय जनता पार्टी-Bharatiya Janata Party) – 62244
3. तुकाराम नामदेव डफळ Tukaram Namdev Daphal (सैनिक समाज पार्टी- Soldier Samaj Party) – 152
3. अविनाश अरविंद मोहिते Avinash Arvind Mohite (संभाजी ब्रिगेड पार्टी -Sambhaji Brigade Party)
4. बलजीतसिंग उत्तमसिंग कोचर Baljit Singh Uttam Singh Kochhar (प्रबुद्ध रिपब्लिकन पार्टी) – 50
5. रवींद्र विठ्ठलराव वेदपाठक Ravindra Vitthalrao Vedapathak (राष्ट्रीय मराठा पार्टी-National Maratha Party) – 40
6. अनिल गेनू हातागले Anil Genu Hatagale (अपक्ष) – 108
7. अभिजित वामनराव आवाडे-बिचकुले Abhijit Vamanrao Awade-Bichkule (अपक्ष) – 47
8. अमोल उर्फ याबेस शमुवेल तुजारे Amol alias Yabes Samuel Tujare (अपक्ष) – 31
9. आनंद कन्हैयालाल दवे Anand Kanhaiyalal Dave (अपक्ष) – 296
10. अजित पांडुरंग इंगळे Ajit Pandurang Ingle (अपक्ष-Independent) – 26
11. सुरेशकुमार बाबूलाल ओसवाल Suresh Kumar Babulal Oswal (अपक्ष) – 60
12. खिसाल जलाल जाफरी Khisal Jalal Jafri (अपक्ष) – 48
13. चंद्रकांत रंभाजी मोटे Chandrakant Rambhaji Mote (अपक्ष) -38
14. रियाज सय्यदअली सय्यद Riyaz Syed Ali Syed (अपक्ष) – 62
15. संतोष कल्याण चौधरी Santosh Kalyan Chaudhary (अपक्ष) -72
16. हुसेन नसरुद्दीन शेख Hussain Nasruddin Sheikh (अपक्ष) – 238
नोटा (NOTA) – 1397

Web Title :- Pune Kasba Peth bypool Election Result | Kasba escaped from the hands of the BJP, the Congress threw the rose; Know how many votes have someone

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Supreme Court | मुख्य निवडणूक आयुक्तांच्या निवडीवर सुप्रीम कोर्टाचा महत्वाचा निकाल, समिती नेमण्याचे आदेश

Jalgaon Crime News | झोपेच्या नादात गच्चीवरुन खाली पडून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू; जळगावमधील घटना