Supreme Court | मुख्य निवडणूक आयुक्तांच्या निवडीवर सुप्रीम कोर्टाचा महत्वाचा निकाल, समिती नेमण्याचे आदेश

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – निवडणूक आयोग आयुक्तांच्या (Election Commission Commissioner) निवडीवरून वाद सुरू असताना सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) केंद्रीय निवडणूक आयोगाविरोधातील एका याचिकेवर निकाल जाहीर केला आहे. यामध्ये जोवर संसदेत कायदा होत नाही तोवर निवडणूक आयुक्तांच्या निवडीसाठी समिती स्थापन करावी, असे सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) म्हटले आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाने एकमताने हा निर्णय दिला आहे. या खंडपीठात (Bench) न्यायमूर्ती ऋषिकेश रॉय (Justice Hrishikesh Roy), न्यायमूर्ती अजय रस्तोगी (Justice Ajay Rastogi), न्यायमूर्ती के एम जोसेफ (Justice KM Joseph), न्यायमूर्ती अनिरुद्ध बोस (Justice Aniruddha Bose) आणि न्यायमूर्ती सीटी रविशंकर (Justice CT Ravi Shankar) यांचा समावेश आहे. सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयात म्हटले की, मुख्य निवडणूक आयुक्त आणि अन्य दोन निवडणूक आयुक्तांची निवड करण्याची शिफारस ही समिती करणार आहे. पंतप्रधान, विरोधी पक्षनेते सरन्यायाधीश यांची समिती राष्ट्रपतींकडे शिफारस करणार आहे.

 

न्यायमूर्ती केएम जोसेफ यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने म्हटले की, आयुक्तांसाठी कायदा करेपर्यंत हा नियम कायम राहणार आहे.
सध्या केवळ पंतप्रधानांच्या सल्ल्याने राष्ट्रपती नेमणुका करतात. आता या निर्णयामध्ये विरोधी पक्षनेते देखील असणार आहेत.
लोकसभेतील सर्वात मोठ्या विरोधी पक्षाच्या नेत्याचा या समितीत सहभाग असणार आहे.
सध्याच्या मुख्य निवडणूक आयुक्त निवडण्याच्या पद्धतीवर आक्षेप घेत अनेक याचिका सुप्रीम कोर्टात (Supreme Court) दाखल करण्यात आल्या होत्या.
त्यानंतर कोर्टाने हा निर्णय घेतला आहे.

 

Web Title :- Supreme Court | sc on election commissioner selection important judgment of supreme court on selection of chief election commissioner order appointing committee

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Kasba Bypoll Election Result | भाजपच्या बालेकिल्ल्यात काँग्रेसची मुसंडी, काँग्रेसचे रवींद्र धंगेकर 11 हजार मतांनी विजयी

Pune Crime News | पत्नीवर वार करणाऱ्या आरोपीला अतिरिक्त सत्र न्यायालयाकडून जामीन मंजूर

SSC Exam | ऑल द बेस्ट! उद्यापासून 10 वीची परीक्षा सुरु, राज्यात 15 लाख 77 हजार विद्यार्थी देणार परीक्षा