Pune Kasba Peth Chinchwad Bypoll Election | सकाळी 11 पर्यंत चिंचवडमध्ये 10.45 तर कसबा पेठेत 8.25 टक्के मतदान

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Kasba Peth Chinchwad Bypoll Election | मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिलेल्या चिंचवड आणि कसबा पेठ विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणुकीसाठी आज मतदान (Voting) होत आहे. या निवडणुकीत भाजप आणि महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) जोरदार प्रचार केला आहे. कसब्यात भाजपचे हेमंत रासने (Hemant Rasane) आणि महामविकास आघाडीचे रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांच्यात थेट लढत होत आहे. तर चिंचवडमध्ये तिरंगी लढत होत आहे. भाजपच्या अश्विनी जगताप (BJP Ashwini Jagtap), मविआचे नाना काटे (Nana Kate) आणि अपक्ष उमेदवार राहुल कलाटे (Rahul Kalate) यांच्यात लढत होत आहे. आज सकाळी 11 वाजेपर्यंत चिंचवडमध्ये 10.45 टक्के तर कसब्यात 8.25 टक्के मतदान झाले.

कसबा पेठ विधानसभा मतदारसंघामध्ये एकूण दोन लाख 75 हजार 679 मतदार असून, 270 मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे. रविवारी होणाऱ्या मतदानासाठी 1250 अधिकारी, कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. तर चिंचवड मतदारसंघामध्ये एकूण पाच लाख 68 हजार 954 मतदार असून, 510 केंद्रांवर मतदान होणार आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी दोन्ही ठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

कसब्याची निवडणूक भाजपसाठी प्रतिष्ठेची आहे. कसब्यातील प्रचारासाठी भाजपने केंद्रीय गृहमंत्र्यांपासून, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि अनेक मंत्र्यांना प्रचारात उतरवले होते.
त्यामुळे कसब्यातील मतदार कोणाच्या बाजूने कौल देणार , याची सर्वांना उत्सुकता आहे.
भाजप आणि मविआकडून जोरदार प्रचार करण्यात आल्याने कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीतील
मतदानाचा टक्का किती असणार, याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.

Web Title :-  Pune Kasba Peth Chinchwad Bypoll Election | 10.45 in Chinchwad and 8.25 percent in Kasba Peth voting till 11 am.