Pune Katraj Crime | फोटो काढण्याच्या बहाण्याने ज्येष्ठ महिलेला लुटले; कात्रज परिसरातील प्रकार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Katraj Crime | फोटो काढण्याचा बहाणा करुन ज्येष्ठ महिलेला बँकेच्या पायरीवर बसवले. त्यानंतर अंगावरील सोन्याचे दागिने काढण्यास सांगून हातचलाखीने दागिने लंपास केल्याची घटना कात्रज परिसरात घडली. हा प्रकार बुधवारी (दि.6) दुपारी बाराच्या सुमारास कात्रज चौकातील एसबीआय बँकेच्या पायरीवर घडला आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत ताराबाई नामदेव अजेटराव (वय-75 रा. घुंगरुवाला चाळ, संतोषनगर, कात्रज) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात (Bharti Vidyapeeth Police Station) शुक्रवारी (दि.8) फिर्याद दिली आहे. यावरुन दोन अज्ञात व्यक्तींवर आयपीसी 406, 420, 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपींनी फिर्यादी यांना तुम्हाला बँकेत परत बोलावले आहे असे सांगून बँकेसमोर बोलवून घेतले.

आरोपींनी फिर्यादी यांना बँकेच्या पायरीवर बसवले. तुम्ही येथेच बसा बँकेत गर्दी आहे.
तुमचा फोटो काढायचा आहे, असे म्हणून अंगावरील सोने काढून पर्समध्ये ठेवण्यास सांगून विश्वास संपादन केला.
फिर्यादी यांनी त्यांच्या अंगावरील 85 हजार 100 ग्रॅम वजनाचे 37 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने पर्समध्ये काढून ठेवले.
त्यानंतर आरोपींनी हात चलाखीने दागिने घेऊन निघून गेले. यानंतर महिलेने पर्समध्ये दागिने पाहिले असता दागिने
दिसले नाहीत. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Raj Thackeray On BJP | राज ठाकरेंचा भाजपाला थेट सवाल, ”मोदींनी येऊन फुलं वाहिली, त्या अरबी समुद्रातील महाराजांच्या स्मारकाचं काय झालं?”

Police Inspector Suicide | पुणे सीआयडीमधील पोलीस निरीक्षकाची आत्महत्या, रेल्वे रुळावर संपवलं जीवन

Pune News | बंगळुरुतील कॅफे बॉम्बस्फोटातील दहशतवादी पुण्यात असल्याचा NIA ला संशय, पथकाकडून तपास सुरु

Khadakwasla Crime | तीन तरुणांवर कोयत्याने हल्ला, दहशत पसरवणाऱ्या आरोपींच्या हवेली पोलिसांनी आवळल्या मुसक्या (Video)

Pune Pimpri Chinchwad Crime | सराईत वाहन चोराला भोसरी पोलिसांकडून अटक, 16 दुचाकी जप्त