Pune Katraj News | पीएमटी महिला कंडक्टरची प्रवासी महिलेला मारहाण, कात्रज बसस्टॉप येथील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Katraj News | धक्का मारुन बसमध्ये चढल्याचा जाब विचारल्याच्या कारणावरून पीएमटी महिला कंडक्टरने सफाई कामगार महिलेला शिवीगाळ करुन हाताने व जेवणाच्या डब्याने मारहाण केली. याप्रकरणी महिला कंडक्टरवर भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात (Bharti Vidyapeeth Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार सोमवारी (दि.8) सायंकाळी साडे सात वाजण्याच्या सुमारास जेएसपीएम कॉलेज समोरील कात्रज बस स्टॉप येथे घडला.

याबाबत गीता रमेश भिमाले (वय-40 रा. मंगळावर पेठ, कात्रज) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी पीएमटी महिला कंडक्टर रेश्मा अजिज सय्यद (वय-27 रा. संतोषीमाता मंदिरासमोर, कात्रज) यांच्यावर आयपीसी 323, 504, 427 नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी आरोपी रेश्मा सय्यद हिला सीआरपीसी 149 प्रमाणे नोटीस दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या सफाई कामगार आहेत.
सोमवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास फिर्यादी निगडी बस मध्ये चढत होत्या.
त्यावेळी आरोपी रेश्मा सय्यद यांनी फिर्यादी यांना धक्का देऊन बसमध्ये चढल्या.
गिता भिमाले यांनी याचा जाब विचारला असता आरोपीने त्यांच्यासोबत वाद घातला.
तसेच शिवीगाळ करुन हाताने व त्यांच्याकडे असलेल्या डब्याने फिर्यादी यांना मारहाण केली.
दोघींमध्ये झालेल्या झटापटीत फिर्यादी यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसुत्र कोठेतरी पडून गहाळ झाल्याचे फिर्य़ादीत
नमूद केले आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune BJP On MLA Ravindra Dhangekar | आमदार रवींद्र धंगेकर म्हणजे हवा भरलेला फुगा, टेंपररी आमदार – भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे

Muralidhar Mohol-Sanskriti Pratishthan | संस्कृती प्रतिष्ठान, शि. प्र. मंडळीतर्फे डॉ. कुमार विश्वास यांच्या ‘अपने अपने राम’ कार्यक्रमाचे 18 ते 20 जानेवारीला आयोजन (Video)

लाइट कट करण्यासाठी आलेल्या वीज कर्मचाऱ्याला मारहाण, कोंढवा परिसरातील घटना

Pune Chronic Garbage Spots | पुण्यात कचरा टाकण्यात येणारे आणि साठला जाणारे नऊशे ‘क्राॅनिक स्पाॅट’ ! 161 ‘स्पाॅट’ कचरा मुक्त करण्यास महापालिका प्रशासनाला यश