Pune Pimpri Chinchwad Crime News | लाइट कट करण्यासाठी आलेल्या वीज कर्मचाऱ्याला मारहाण, कोंढवा परिसरातील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – वीज बिल न भरणाऱ्यांवर महावितरण कंपनीकडून (Mahavitaran Company) कारवाई केली जात आहे. कोंढवा परिसरात विज कट करण्यासाठी आलेल्या महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्याला मारहाण केल्याची घटना घडली. याप्रकरणी एका व्यक्तीवर सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार गॅलेक्सी प्रिमीयम सोसायटी, कौसरबाग येथे सोमवारी सकाळी पावणे बाराच्या सुमारास घडला आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

याबाबत महावितरण कंपनीचे कर्मचारी वकार अहमद मोहम्मद मुख्तार शेख (वय-36 रा. साईबाबा नगर, कोंढवा खु.) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात (Kondhwa Police Station) फिर्य़ाद दिली आहे. पोलिसांनी अफजल बागवान (रा. गॅलेक्सी प्रिमीयर सोसायटी समोर, कौसरबाग, कोंढवा) याच्यावर आयपीसी 353, 323, 504, 506 नुसार गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अफजल बागवान याने वीजदेयक न भरल्याने फिर्य़ादी वकार शेख व त्यांचे सहकारी समाधान मोरे हे वरिष्ठ अधिकारी विजयकुमार माने यांच्या आदेशानुसार आरोपीचा वीजपुरवठा खंडित करण्यासाठी गेले होते. वीज मीटरवर कारवाईसाठी शेख गॅलेक्सी प्रिमीयम सोसायटीच्या आवारात पोहोचले असता बागवान हातात फायबर पाईप घेऊन अंगावर धावून आला. शेख यांना ढकलून देत त्यांची कॉलर पकडून बाहेर घेऊन आला. त्याने फिर्यादी शेख यांच्या कानशिलात लगावली. तसेच शिवीगाळ करुन हात तोडण्याची धमकी दिली. सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी बागवान याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक जाधव करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Shivsena Chief Uddhav Thackeray | शिंदे-नार्वेकरांच्या भेटीवर उद्धव ठाकरेंचे वक्तव्य, न्यायमूर्ती आरोपीला दोनदा भेटले, मग कोणत्या न्यायाची अपेक्षा करायची

तरुणीची छेड काढून विनयभंग करणाऱ्या रोडरोमिओला तळेगाव दाभाडे पोलिसांकडून अटक

Devendra Fadnavis | देवेंद्र फडणवीसांचे आमदार अपात्रता निकालावर महत्वाचे वक्तव्य, ”आमचे सरकार आजही आहे, उद्याही राहणार”

NCP Chief Sharad Pawar | शरद पवार स्पष्टच म्हणाले, ”अजित पवार आणि त्यांच्यासह गेलेल्या आमदारांविषयी आता फेरविचार…”

Shivsena Mla Disqualification | मोठी बातमी! आमदार अपात्रता प्रकरणी नार्वेकरांचे अत्यंत महत्वाचे वक्तव्य, ”उद्या निकाल द्यायचा प्रयत्न करू, निकालपत्र ५०० पानांचे”