
Pune Katraj News | पुण्याची ‘ती फुलराणी’ झाली 8 वर्षांची!
पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Pune Katraj News | पुण्यातील कात्रज परिसरात एक महत्त्वपूर्ण आकर्षण असलेल्या ‘फुलराणी’ला (Phulrani Katraj) शुक्रवारी आठ वर्ष पूर्ण झाली आहेत. यानिमित्ताने नानासाहेब पेशवे उद्यानाच्या (Nana Saheb Peshwe Udyan ) सौंदर्यात भर घालणाऱ्या या फुलराणीचा वाढदिवस जोरदार साजरा कारण्यात आला. चिमुरड्यांच्या पसंतीदार या रेल्वेगाडीला आकर्षक फुलांनी व रंगीबेरंगी फुग्यांनी खास सजवण्यात आले होते. (Pune Katraj News)
अगदी या फुलराणीच्या वाढदिवसाचा केक देखील माजी नगरसेवक वसंत मोरे (Vasant More) यांच्या हस्ते कापण्यात आला. कात्रज परिसरातील या उद्यानात कृत्रिम तलाव, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा, पाटीलवाडा यांचबरोबर सगळ्यांची लाडकी फुलराणी २०१५ पासून साऱ्यांचे लक्ष वेधून घेते आहे.
या उद्यानाचे प्रमुख उत्पादन स्त्रोत असलेला हा प्रकल्प मात्र प्रशासनाच्या (PMC) दुर्लक्षामुळे गेली ५ वर्षे बंद
पडला होता. मोरे यांनी पाठपुरावा केल्यानंतर गेल्या 26 जानेवारीपासून फुलराणी पुन्हा सुरू झाली. पर्यटकांच्या आनंद व्दिगुणीत करत अवघ्या तीन महिन्यांत फुलराणीने महापालिकेला Pune Municipal Corporation (PMC) एक लाख 70 हजार रुपयांचे उत्पन्न मिळवून दिले आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे आकर्षण व त्यांना आनंद देणारी ही फुलराणी पर्यटनाच्या (Tourisum) माध्यमातून उत्पन्न मिळवून देणारी उत्तम साधन असल्याने या प्रकल्पाकडे महापालिका प्रशासनाने विशेष लक्ष देण्याची गरज असल्याचे या वेळी मोरे यांनी सांगितले. मंगेश रासकर (Mangesh Raskar), उद्यान निरीक्षक ताम्हाणे आदींसह कर्मचारी या वेळी उपस्थित होते. (Pune Katraj News)
Web Title :- Pune Katraj News | Vasant More : Katraj PhulRani Becomes Eight Year Old Celebration Birthday
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Pune Police Crime Branch News | मोबाईल हिसकाविणार्या दोघांना गुन्हे शाखेकडून अटक, अल्पवयीन ताब्यात