Pune Police Crime Branch News | मोबाईल हिसकाविणार्‍या दोघांना गुन्हे शाखेकडून अटक, अल्पवयीन ताब्यात

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Police Crime Branch News | मोबाईल हिसकावल्यानंतर (Mobile Device Theft) चोरीचे मोबाईल विक्री करणार्‍या दोघांना गुन्हे शाखेच्या युनिट- 1च्या पथकाने अटक केली असून त्यांच्या एका अल्पवयीन साथीदारास ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्याकडून 6 मोबाईल आणि गुन्हयात वापरलेली मोपेड अ‍ॅक्टिव्हा असा एकुण 1 लाख 53 हजार रूपयाचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. (Pune Police Crime Branch News)

अदित्य प्रशांत साळवे Aditya Prashant Salve (19, रा. सर्व्हे नं. 25, जयविजय चौक, बोपोडी, पुणे) आणि सचिन अशोक केंगार Sachin Ashok Kengar (19, रा. कमळाबाई बहिरट चौक, सम्राट नगर, बोपोडी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांचा एका अल्पवयीन साथीदारास ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिस नाईक अभिनव लडकत यांना काही जण फरासखाना पोलिस ठाण्याच्या (Faraskhana Police Station) हद्दीतील मोबाईल मार्केटमध्ये (Pune Mobile Market) मोबाईलची विक्री करीत असल्याची माहिती मिळाली होती. मिळालेल्या माहितीची खातरजमा केल्यानंतर पोलिसांनी सापळा रचुन त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे सखोल चोकशी केली असता त्यांनी पहाटेच्या वेळी बाहेर गावावरून येणार्‍या प्रवाशांना एकटे जात असताना गाठून त्यांच्याकडील मोबाईल जबरदस्तीने चोरल्याची कबुली दिली. आरोपींकडून शिवाजीनगर पोलिस स्टेशनमध्ये दाखल असलेले 3, खडक पोलिस स्टेशन, विश्रामबाग पोलिस स्टेशन (Vishrambaug Police Station) आणि मुंढवा पोलिस स्टेशनमध्ये (Mundhwa Police Station) दाखल असलेला प्रत्येकी एक असे एकुण 6 गुन्हे उघडकीस आणण्यात आले आहेत. (Pune Police Crime Branch News)

आरोपींना खडक पोलिस स्टेशनच्या (Khadak Police Station) ताब्यात देण्यात आले आहे.
सदरील कारवाई पोलिस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar), सह आयुक्त संदिप कर्णिक
(IPS Sandeep Karnik), गुन्हे शाखेचे अप्पर पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे (IPS Ramnath Pokale),
पोलिस उपायुक्त अमोल झेंडे (DCP Amol Zende), सहाय्यक आयुक्त सुनिल पवार (ACP Sunil Pawar)
यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट-1 चे प्रभारी वरिष्ठ पोलिस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील (Sr PI Krantikumar Patil),
पोलिस उपनिरीक्षक सुनिल कुलकर्णी (PSI Sunil Kulkarni), पोलिस उपनिरीक्षक तापकीर (PSI Tapkir), पोलिस उपनिरीक्षक जाधव (PSI Jadhav), सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक राहुल मखरे,
पोलिस अंमलदार अभिनव लडकत, अनिकेत बाबर, शशिकांत दरेकर, दत्ता सोनावणे, निलेश साबळे, अमोल पवार,
अय्याज दड्डीकर, विठ्ठल साळुंखे, शुभम देसाई, रूक्साना नदाफ आणि तुषार माळवदकर यांनी केली आहे.

Web Title :-  Pune Police Crime Branch News | Crime Branch arrested two mobile phone grabbers, minors are in custody

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Police Crime News | अवैध धंद्यांबाबत DG कंट्रोलकडून शहर नियंत्रण कक्षात ‘कॉल’, पोलिस आयुक्तांचे ‘क्रॉस रेड’ करण्याचे उपायुक्तांना आदेश

NCP Chief Sharad Pawar Resigns | शरद पवारांचा राजीनामा राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीनं फेटाळला, पुढं काय होणार याकडे सर्वांचे लक्ष (Video)

Journalist Amol Kavitkar | भाजपाच्या ‘पश्चिम महाराष्ट्र माध्यम प्रमुख’पदी अमोल कविटकर