Pune Khadki Crime News | रिक्षांची तोडफोड करुन दोघांवर प्राणघातक हल्ला, खडकी परिसरातील प्रकार; दोघांना अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Khadki Crime News | रस्त्याच्या कडेला पार्क केलेल्या रिक्षांची तोडफोड करणाऱ्या टोळक्याला अडवण्यासाठी गेलेल्या दोघांवर धारदार हत्याराने हल्ला करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला (Attempt To Murder). हा प्रकार खडकी बाजार येथील इंदीरानगर कमानीजवळ शनिवारी (दि.10) दुपारी दीडच्या सुमारास घडला आहे. याप्रकरणी खडकी पोलिसांनी चार जणांवर गुन्हा दाखल करुन दोघांना अटक केली आहे.

याबाबत कासिम निजामुद्दीन शेख (वय-26 रा. गणपती मंदिराच्या मागे, खडकी बाजार) यांनी खडकी पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली आहे. यावरुन गणेश सुधमन्यम पिल्ले (वय-26 रा. महादेववाडी, खडकी), रितीक उर्फ मल्हार संजय अवघडे (वय-25 रा. खडकी) यांना अटक केली आहे. तर त्यांचे साथीदार अलंकर प्रेम कांबळे (वय-26 रा. इंदिरानगर वसाहत, खडकी) व त्याच्यासोबत असणाऱ्या एकावर आयपीसी 307, 323, 504, 427 सह आर्म अॅक्ट, क्रिमिनल लॉ अमेंडमेंट अॅक्ट, महाराष्ट्र पोलीस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि फिर्यादी एकाच परिसरात राहात. शनिवारी दुपारी दीडच्या सुमारास आरोपी रस्त्याच्या कडेला पार्क केलेल्या रिक्षांची तोडफोड करुन नुकसान करत होते. त्यावेळी फिर्यादी व त्यांचा मित्र रोहन करडे हे आरोपींना अडवण्यासाठी गेले. त्यावेळी आरोपींनी दोघांना जीवे मारण्याच्या उद्देशाने धारदार हत्याराने त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. तसेच हातातील हत्यारे हवेत फिरवून परिसरात दहशत निर्माण केली.

घटनेची माहिती मिळताच खडकी विभागाचे सहायक पोलीस आयुक्त आरती बनसोडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीश दिघावकर, सहायक पोलीस निरीक्षक देशमुख, पोलीस उपनिरीक्षक गुंजाळ यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी दोघांना अटक केली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गुंजाळ करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

लहान मुलांच्या भांडणातून मोठ्यांमध्ये हाणामारी, औंध परिसरातील प्रकार