Pune Khadki Crime News | पुणे : उसने पैसे देण्यास नकार दिल्याने टोळक्याकडून तरुणाला रॉडने मारहाण, दोघांना अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Khadki Crime News | पाचशे रुपये उसने देण्यास नकार दिल्याचा राग मनात धरुन चार जणांच्या टोळक्याने तरुणाच्या डोक्यात लोखंडी रॉडने मारहाण करुन गंभीर जखमी केले. हा प्रकार खडकी येथील कल्पेश ज्वेलर्स चौकातील सार्वजनिक रोडवर शुक्रवारी (दि.9) दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास घडला आहे. याप्रकरणी खडकी पोलिसांनी (Khadki Police Station) चार जणांवर गुन्हा दाखल करुन दोघांना अटक केली आहे.

याबाबत मोहम्मद शाहरुख अन्सार खान (वय-25 रा. वृंदावन कॉलनी, रहाटणी, काळेवाडी) यांनी खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन प्रथमेश अनिल इंगळे (वय-20 रा. खडकी), अनिकेत प्रकाश धोत्रे (वय-21 रा. ऑर्चिड लॉज गेस्ट हाऊस, खडकी) यांना अटक केली आहे. तर अमित गायकवाड, आसिफ उर्फ टकल्या यांच्यावर आयपीसी 324, 323, 504, महाराष्ट्र पोलीस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी व फिर्यादी एकमेकांच्या ओळखीचे आहेत. आरोपी प्रथमेश इंगळे याने फिर्यादी यांना 500 रुपये उसने मागितले. मात्र, फिर्यादी यांनी उसने पैसे देण्यास नकार दिला. याचा राग आरोपीला आला. दरम्यान फिर्यादी व त्यांचा भोऊ मोईद हे कल्पेश ज्वेलर्स चौकातील सार्वजनिक रोडवर कपडे विकत होते. त्यावेळी आरोपी त्याठिकाणी आला. उसने पैसे देण्यास नकार दिल्याच्या रागातून आरोपीने फिर्यादी यांच्या भावाच्या डोक्यात लोखंडी रॉड मारुन गंभीर जखमी केले. तसेच इतर आरोपींनी लाकडी दांडके हातावर मारुन फिर्यादी यांना शिवीगाळ केली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रिकीबे करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

हडपसर परिसरातील भन्नाट बिर्याणी हाऊसमध्ये सिलेंडरचा स्फोट (Video)