Pune Kondhwa Crime | पोलिसांकडे तक्रार केल्याच्या रागातून वकील दाम्पत्याला मारहाण, कोंढवा परिसरातील प्रकार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Kondhwa Crime | पोलिसांकडे तक्रार केल्याच्या रागातून दुचाकीवरून जाणाऱ्या वकील दाम्पत्याला भररस्त्यात अडवून मारहाण केली. तसेच महिलेला अश्लील शिवीगाळ करुन विनयभंग केला. ही घटना रविवारी (दि.18) दुपारी तीनच्या सुमारास कोंढवा परिसरातील जगदंबा भवन रोडवरील आधार डेरी समोर घडली आहे. याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी (Kondhwa Police) दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत मोहमद याकुब शेख (वय-37 रा. पिसोळी) यांनी सोमवारी (दि.19) कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन वसीम इकबाल खान (रा. गार्डनीया, फेज-2 वडगाव शेऱी, पुणे) व युनुस त्रासगर (रा. ताज मंडील, वडाची वाडी, उंड्री) यांच्यावर आयपीसी 341, 324, 323, 294, 354, 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे. (Pune Kondhwa Crime)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व त्यांच्या पत्नीचा वकीली व्यवसाय आहे. आरोपी वसीम खान हा त्यांच्या सोसायटीत राहत आहे. फिर्यादी यांच्या पत्नीने एका प्रकरणात वकील पत्र घेतले आहे. वसीम खान याने वकील पत्र घेऊ नये यासाठी फिर्य़ादी यांच्या पत्नीला धमकी दिली होती. याप्रकरणी वसीम खान याच्याविरोधात कोंढवा पोलिसांनी धमकावणे व खंडणी मागितल्याचा गुन्हा दाखल केला होता. याचा राग मनात धरुन त्याने व त्याच्या बहिणीने फिर्यादी यांच्या घरावर हल्ला केला होता.

याप्रकरणी फिर्यादी यांनी वसीम याच्या विरोधात पुन्हा पोलिसांकडे तक्रार केली होती.
या गुन्ह्यात पोलिसांनी वसीम विरोधात दोषारोपत्र दाखल केले होते. मात्र तो फरार असल्याचे पोलिसांनी दाखवले होते. त्यामुळे हा गुन्हा हडपसर विभागाचे सहायक पोलीस आयुक्त यांच्याकडे वर्ग करण्यात आल्याने पुन्हा तपास सुरु करण्यात आला. तसेच फिर्यादी यांनी वसीमचा पत्ता शोधून पोलिसांना सांगितला होता. याचा देखील राग वसीमच्या मनात होता.

रविवारी दुपारी तीनच्या सुमारास फिर्यादी व त्यांच्या पत्नी कोंढवा पोलीस ठाण्यात जात होते.
त्यावेळी जगदंबा रोडवरील आधार डेरी जवळ आरोपी बसले होते. फिर्यादी यांना पाहताच त्यांनी त्यांची दुचाकी आडवली.
वसीम याने फिर्यादी यांच्या पत्नीला शिवीगाळ करुन बुर्खा ओढण्याचा प्रयत्न केला.
तसेच फिर्यादी यांची गचांडी पकडून गॅस पाईपने मारहाण केली. त्यावेळी फिर्यादी यांची पत्नी मध्ये आली असता
त्यांना देखील मारहाण करुन गंभीर जखमी केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास कोंढवा पोलीस करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune CP Amitesh Kumar | पोलीस आयुक्त अमितेश कुमार अ‍ॅक्शन मोडवर! पब, बार, रेस्टो बार, रूफ टॉप हॉटेल, क्लब आणि हुक्का पार्लर संदर्भात पुणे पोलिसांचा मोठा निर्णय (Video)

Pune Crime Branch | पुणे गुन्हे शाखेची मोठी कारवाई! ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश, साडेतीन कोटी रुपयांचे एम.डी जप्त (Video)

Namo Chashak 2024 In Pune | नमो चषक जिल्हास्तरीय शिवकालीन युद्धकला (सिलंबम) स्पर्धा संपन्न

50 लाखांच्या खंडणीसाठी दहा वर्षांच्या मुलाचे अपहरण; पोलिसांनी केली सुखरूप सुटका