Pune Kondhwa Crime | चोरीचा प्रयत्न करताना साराईत गुन्हेगाराला कोंढवा पोलिसांकडून अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Kondhwa Crime | चोरीचा प्रयत्न करण्याऱ्या सराईत गुन्हेगाराल कोंढवा पोलिसांनी (Kondhwa Police) अटक केली आहे. तर त्याच्या अल्पवयीन साथीदाराला ताब्यात घेतले आहे. ही कारवाई 3 मार्च रोजी उंड्री-पिसोळी बायपास (Undri Pisoli Bypass) रोडवरील इनसिंगनिया बुक लॅन्ड हाऊसिंग सोसायटीत (Insignia Brooklands Undri) केली.

चिरंजीव शत्रु काळे (वय-28 मुळ रा. फलटण जि. सातारा, सध्या रा. रेंजहिल्स झोपडपट्टी, खडकी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. तर 17 वर्षीय अल्पवयीन मुलाला ताब्यात घेऊन फरार झालेल्या राहुल जयराम पवार याच्यावर आयपीसी 336, 457, 511, 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे. याबाबत नामदेव सटवाजी खरटमल (वय-68 रा. इनसिंगनिया बुक लॅन्ड हाऊसिंग सोसायटी, उंड्री-पिसोळी बायपास रोड, पिसोळी) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. (Pune Kondhwa Crime)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या सोसायटीमधील बंद असणाऱे फ्लॅट मध्ये चोरी करण्याच्या उद्देशाने आरोपी आले होते. सोसायटीच्या वॉल कंपाऊंडची तार कट करुन सोसायटीत चोरीचा प्रयत्न करत असताना चिरंजीव काळे व त्याच्या अल्पवयीन साथीदाराला पकडण्यात आले. तर त्यांचा एक साथीदार अंधाराचा फायदा घेऊन पळून गेला.
आरोपींकडून पक्कड, लोखंडी रॉड जप्त करण्यात आला आहे.
आरोपी चिरंजीव काळे हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर फलटण, चिंचवड, निगडी पोलीस ठाण्यात
आठ गुन्हे दाखल असल्याची माहिती कोंढवा पोलिसांनी दिली आहे. पुढील तपास कोंढवा पोलीस करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Rohit Pawar On Praful Patel | प्रफुल्ल पटेलांची 840 कोटींची केस सीबीआयने बंद केली,
आता काहीही बोलू शकतो असं त्यांना वाटतंय : रोहित पवार

Pune Police News | पुणे: पोलिस कर्मचाऱ्याची गोळी झाडून आत्महत्या

Pune Dhankawadi Crime | पुणे : घराचे बनावट कुलमुखत्यारपत्र तयार केल्याप्रकरणी तिघांना अटक