Pune Kondhwa News | ईद-ए-मिलाद मिरवणुकीदरम्यान पोलीस व कार्यकर्त्यांकडून कोंढवा परिसरातील वाहतुकीचे व्यवस्थापन

कोंढवा पोलिसांकडून एसडीपीआय डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाच्या कार्यकर्त्यांचे कौतुक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Kondhwa News | कोंढवा परिसरामध्ये ईद-ए-मिलाद (Eid E Milad) मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी काढण्यात आलेल्या मिरवणुकांचे स्वागत करण्यासाठी कोंढवा पोलिसांकडून (Kondhwa Police Station) स्वागत कक्ष उभारण्यात आला होता. मिरवणुकीत सहभागी झालेल्या लहान मुलांचे पोलीस उपायुक्त विक्रांत देशमुख (DCP Vikrant Deshmukh), कोंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. तर एसडीपीआय डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाच्या कार्यकर्त्यांनी मिरवणुकीमुळे वाहतूक कोंडी (Traffic Jam) होऊ नये यासाठी पोलिसांच्या मदतीने वाहतुकीचे व्यवस्थापन केले. योग्य नियोजन केल्याबद्दल कोंढवा पोलिसांनी एसडीपीआय टीमचे कौतुक केले. (Pune Kondhwa News)

SDPI सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाने ईद-ए-मिलादुन्नबीच्या मिरवणुकीत वाहतुकीचे व्यवस्थापन केले. मिरवणुकीमुळे सर्वसामान्यांना कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी कार्यकर्त्यांनी कोंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे (Sr PI Santosh Soanawane) यांच्या समवेत वाहतूक सुरळीत केली. वाहतूक सुरळीत राहावी, वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी एसडीपीआयच्या 60 कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला होता. वाहतूक व्यवस्थापन करुन आपली जबाबदारी व्यवस्थितपणे पार पाडली याबद्दल कोंढवा पोलिसांनी एसडीपीआयच्या टीमचे कौतुक केले आहे. (Pune Kondhwa News)

कोंढवा पोलीस स्टेशन मधील 28 मंडळांनी यामध्ये सहभाग घेतला होता. त्यामधील 2 मंडळांनी कोंढवा पोलीस स्टेशन हद्दीमध्ये जागेवरती मिरवणूक पूर्ण केली. तर 26 मंडळे पुणे शहरामध्ये कार्यक्रमाकरिता रवाना झाली. मंडळाचे अध्यक्ष पदाधिकारी यांना पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच प्रत्येक मंडळाच्या कार्यकर्त्यांनी शिस्तीमध्ये आपली मिरवणूक घेऊन जावी, वाहतुकीचे नियम पाळावेत, स्पीकरचा आवाज नियमात ठेवावा, असे आवाहन कोंढवा पोलिसांकडून करण्यात आले.

संपूर्ण मिरवणूक मार्गावर वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे यांच्या मार्गदर्शनखाली पोलीस निरीक्षक संदीप भोसले
(PI Sandeep Bhosale), संजय मोगले (PI Sanjay Mogle) तसेच कोंढवा पोलीस स्टेशन मधील सर्व अधिकारी
अंमलदार यांनी यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | कोंढवा : बनावट नाव धारण करुन लग्नाचे आमिष दाखवून केला बलात्कार; 26 लाखांची फसवणूक