Pune Kondhwa Police | अट्टल गुन्हेगारांना पिस्टलसह कोंढवा पोलिसांकडून अटक, बोपदेव घाटातील कारवाई (Video)

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Kondhwa Police | पोलीस रेकॉर्डवरील दोन अट्टल गुन्हेगारांना तिघांना कोंढवा पोलिसांनी अटक केली आहे. अटक केलेल्या आरोपींकडून दोन पिस्टल व सहा जिवंत काडतुसे, शेवरोलेट कार असा एकूण 2 लाख 78 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई शनिवारी (दि.17) सायंकाळी सातच्या सुमारास बोपदेव घाटाकडे (Bopdev Ghat) जाणाऱ्या रस्त्यावरील हॉटेल गारवा हिल्स (Hotel Garva Hills) येथे केली.

प्रफुल्ल निवृत्ती निकम (वय 41, रा. साकुर्डी ता.कराड जि. सातारा), सिमॉन रोमिओ मिरींडा (वय-25 रा. माझीवडा गाव, ठाणे वेस्ट), समीर भगवान संकपाळ (वय-25 रा. मु.पो. मोप्रे, ता. कराड जि. सातारा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपींवर कोंढवा पोलीस ठाण्यात आर्म अॅक्ट, महाराष्ट्र पोलीस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.(Pune Kondhwa Police)

कोंढवा पोलीस ठाण्यातील तपास पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक दिनेशकुमार पाटील व पोलीस हवालदार विशाल मेमाणे यांना माहिती मिळाली की, बोपदेव घाटाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या चढावर हॉटेल गारवा हिल्स येथे एका पांढऱ्या रंगाच्या चारचाकी मधून तीनजण जेवायला येणार आहेत. त्यांच्याकडे पिस्टल आहे. मिळालेल्या माहितीची खात्री केली असता संशयित गाडी हॉटेलच्या पुढे काही अंतरावर एका सोसायटीच्या कंपाउंड जवळ थांबल्याचे आढळून आली. तिघेजण गाडीजवळ गप्पा मारत थांबले होते.

पोलिसांनी सापळा रचून त्यांना ताब्यात घेतले. तिघांची अंगझडती घेतली असता प्रफुल्ल निकम याच्या कमरेला एक लोखंडी पिस्टल व तीन जिवंत काडतुसे आढळून आले. तर सिमॉन याच्याकडे एक देशी बनावटीचे लोखंडी पिस्टल व तीन जिवंत काडतुसे आढळून आले. पोलिसांनी आरोपींकडून एक लाख 3 हजार रुपयांचे दोन पिस्टल व सहा जिवंत काडतुसे जप्त केले. तसेच गुन्ह्यात वापरलेली कार जप्त केली. आरोपी प्रफुल्ल निकम सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर पाटण, कराड, कासारवाडी पोलीस ठाण्यात पाच गुन्हे दाखल आहेत. तर सिमॉन याच्यावर नवपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. पुढील तपास पोलीस हवालदार सतिश चव्हाण करीत आहेत.

ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त प्रविण पवार, अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक
विभाग मनोज पाटील, पोलीस उपायुक्त आर राजा, सहायक पोलीस आयुक्त गणेश इंगळे,
वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे, पोलीस निरीक्षक गुन्हे मानसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तपास
पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक लेखाजी शिंदे, पोलीस अंमलदार विशाल मेमाणे, सतिश चव्हाण, लवेश शिंदे, शाहीद शेख,
लक्ष्मण होळकर, संतोष बनसुडे, सुजित मदन, सुरज शुक्ला यांच्या पथकाने केली आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune CP Amitesh Kumar | पोलीस आयुक्त अमितेश कुमार अ‍ॅक्शन मोडवर! पब, बार, रेस्टो बार, रूफ टॉप हॉटेल, क्लब आणि हुक्का पार्लर संदर्भात पुणे पोलिसांचा मोठा निर्णय (Video)

Pune Crime Branch | पुणे गुन्हे शाखेची मोठी कारवाई! ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश, साडेतीन कोटी रुपयांचे एम.डी जप्त (Video)

Namo Chashak 2024 In Pune | नमो चषक जिल्हास्तरीय शिवकालीन युद्धकला (सिलंबम) स्पर्धा संपन्न

50 लाखांच्या खंडणीसाठी दहा वर्षांच्या मुलाचे अपहरण; पोलिसांनी केली सुखरूप सुटका