Pune Uttam Nagar Crime | शेअर ट्रेडिंगमध्ये गुंतवणुकीच्या आमिषाने 4 लाखांची फसवणूक

पुणे : Pune Uttam Nagar Crime | शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग (Trading In Share Market ) करुन भरघोस नफा मिळवून देण्याच्या आमिषाने तरुणीला ४ लाख रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. (Pune Cheating Fraud Case)

याप्रकरणी भूपेंद्र नथ्थू बागड (वय ५५, रा. शिवणे) यांनी उत्तमनगर पोलीस ठाण्यात फिर्याद (गु. रजि. नं. १७/२४) दिली आहे. हा प्रकार २३ नोव्हेबर २०२३ ते २ मार्च २०२४ दरम्यान घडला.

पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, फिर्यादींच्या मुलीला सायबर चोरट्याने व्हॅटसॲपवर संपर्क साधला. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक शिकवण्याचा बहाणा केला. गुंतवणूक करून ट्रेडिंग केल्यास चांगला परतावा मिळतो असे सांगितले. त्यानंतर शेअर्स आणि आयपीओ यामध्ये गुंतवणूक करण्यास भाग पाडले. त्यांच्या ॲपवर शेअर ट्रेडिंग मधून फायदा झाल्याचे दिसून येत होते. आणखी पैसे मिळतील असे आमिष दाखवून फिर्यादींच्या मुलीला ४ लाख १५ हजार रुपये भरण्यास भाग पाडले. पैसे परत मिळत नसल्याचे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक वाय एन शेख (Sr PI YN Shaikh) तपास करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

महिलेला जीवे मारण्याची धमकी देणार्‍यास अटक; अ‍ॅट्रोसिटीखाली गुन्हा दाखल