Pune Kothrud Ganesh Festival 2023 | कोथरूड गणेश फेस्टिव्हलचे रविवारी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते होणार उद्घाटन; कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. निलम गोर्‍हे यांची उपस्थिती तर प्रमुख पाहुणे म्हणून मंत्री उदय सामंत आणि खासदार सुनिल तटकरे उपस्थित राहणार

दीपक मानकर, संदीप खर्डेकर, ॲड मंदार जोशी, किरण साळी आणि सुनील महाजन यांनी दिली सविस्तर माहिती

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन- Pune Kothrud Ganesh Festival 2023 | सार्वजनिक गणेशोत्सव काळात सांस्कृतिक कार्यक्रमांचा नजराणा सादर करणारा कोथरूड गणेश फेस्टिव्हल यंदा दुसरे वर्ष साजरे करीत असून, यंदा रविवार दि. २४ व सोमवार दि. २५ सप्टेंबर २०२३ या दोन दिवशी कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे हा फेस्टिव्हल संपन्न होणार आहे अशी माहिती दीपक मानकर (Deepak Mankar), संदीप खर्डेकर (Sandeep Khardekar), ॲड मंदार जोशी (Adv Mandar Joshi) , किरण साळी (Kiran Sali) आणि सुनील महाजन (Sunil Mahajan) यांनी दिली. (Pune Kothrud Ganesh Festival 2023)

याचे उद्घाटन रविवार दि. २४ सप्टेंबर रोजी सायं. ५.०० वाजता उच्च व तंत्र शिक्षण मंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील (Chandrakant Patil) यांच्या शुभहस्ते होणार असून विधान परिषदेच्या उपसभापती मा. डॉ. निलम गोऱ्हे (Dr Neelam Gorhe) या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवतील. महाराष्ट्राचे उद्योग मंत्री ना. उदय सामंत (Uday Samant) आणि राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष खा. सुनिल तटकरे (Sunil Tatkare) प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. (Pune Kothrud Ganesh Festival 2023)

समाजात विविध क्षेत्रात सातत्याने योगदान देणाऱ्यांचा उद्घाटन सोहळ्यात “कोथरुड सन्मान” पुरस्कार देऊन गौरवले जाणार आहे. प्रवीण बढेकर (उद्योजक), संजय चोरडिया (शिक्षण), डॉ. जितेंद्र जोशी (आंतरराष्ट्रीय उद्योजक), शिरीष देशपांडे (बँकिंग क्षेत्र), पं. विजय घाटे (तबला), डॉ. सलील कुलकर्णी (संगीत), देवेंद्र गायकवाड (अभिनेता–दिग्दर्शक) यांचा समावेश आहे.

कोथरूड गणेश फेस्टिव्हलचे आयोजन ‘आम्ही कोथरूडकर’ यांनी आयोजित केले असून ‘संवाद पुणे’ यांची निर्मिती आहे. सर्व कार्यक्रम रसिकांसाठी विनामूल्य आहेत.

सांस्कृतिक कार्यक्रम –

उद्घाटनानंतर जिगीषा अष्टविनायक निर्मित ‘संज्या छाया’ हे तुफान लोकप्रिय नाटक सादर होईल. यामध्ये वैभव मांगले आणि निर्मिती सावंत हे कलाकार असून लेखक – प्रशांत दळवी, दिग्दर्शक- चंद्रकांत कुलकर्णी, नेपथ्य- प्रदीप मुळ्ये हे असून संगीत- पुरुषोत्तम बेर्डे यांचे आहे.

त्याच दिवशी रात्री ९.०० वाजता ‘मराठी हास्यकवी संमेलन’ सादर होईल. यामध्ये ज्येष्ठ कवी रामदास फुटाणे, अशोक नायगावकर, प्रशांत मोरे, नितीन देशमुख, नारायण पुरी, भरत दौंडकर, सारंग पांपटवार, नीलम माणगावे, वैशाली पतंगे, हर्षदा सुखटणकर आणि मृणालिनी कानिटकर यांचा सहभाग असेल.

सोमवार, दि. २५ सप्टेंबर रोजी दु. १२.०० वा. जेम्स बॉंड ००९ प्रस्तुत 5G गेम शो ‘कोथरूडच्या सौभाग्यवती’ कार्यक्रम होईल. उपमुख्यमंत्री मा. ना. अजित पवार यांची मुख्य उपस्थिती असणार आहे. संदीप सुरेंद्र पाटील हे याचे सादरकर्ते असून मा. अमृताताई देवेंद्र फडणवीस, मा. सुनेत्राताई अजित पवार, मा. वृषालीताई श्रीकांत शिंदे, मा. सीमाताई रामदास आठवले आणि अभिनेत्री मा. स्नेहल प्रवीण तरडे यांना आमंत्रित केले आहे. असा कार्यक्रम फेस्टिव्हलमध्ये प्रथमच होत आहे.

याच दिवशी सायं. ५.०० वाजता शिवराज्याभिषेकाच्या ३५०व्या वर्धापनदिनानिमित्त ‘मराठी पाऊल पडते पुढे’ हा
कार्यक्रम संपन्न होईल. या कार्यक्रमाची संकल्पना, दिग्दर्शन व निर्मिती उदय साटम यांची आहे. सौ. ज्योती उदय साटम
या कार्यक्रमाच्या सहनिर्मात्या आहेत.

याच दिवशी रात्री ९.०० वाजता ‘आयुष्यावर बोलू काही’ हा कार्यक्रम सादर होईल. कवी संदीप खरे आणि संगीतकार
डॉ. सलील कुलकर्णी हे याचे सादरकर्ते असून संयोजन समिती याचे आयोजक आहेत.

कोथरूड गणेश फेस्टिव्हलचे स्वागत अध्यक्ष महाराष्ट्राचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री
ना. चंद्रकांतदादा पाटील असून पुणे शहर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष दीपक मानकर, ‘संवाद पुणे’चे अध्यक्ष
सुनील महाजन, भारतीय जनता पार्टीचे प्रदेश प्रवक्ते संदीप खर्डेकर, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे महाराष्ट्र
प्रदेश कार्यकारिणी सदस्य अ‍ॅड. मंदार जोशी व महाराष्ट्र प्रदेश युवा सेनेचे सचीव किरण साळी हे आयोजक आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

NCP Rohit Pawar On BJP Devendra Fadnavis | MPSC पेपर फोडणाऱ्यांची नावं गुणवत्ता यादीत, रोहित पवारांचे देवेंद्र फडणवीसांवर टीकास्त्र

Shivsena Ramdas Kadam On Thackeray Group | ’16 आमदारांची तिरडी बांधली’ संजय राऊतांच्या टीकेला शिंदे गटाचे प्रत्युत्तर, म्हणाले – ‘स्मशानात जायला…’