Pune Lok Sabha Election 2024 | ‘पुणेरी बॅनर्स’द्वारे लोकसभा उमेदवारांना डोस, ”पाच वर्ष पक्ष सोडणार नाही, असं आश्वासन द्या”

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Pune Lok Sabha Election 2024 | खोचक, फिरकी घेणाऱ्या पुणेरी पाट्या सर्वत्र प्रसिद्ध आहेत. आता लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत पुणेरी बॅनर्स देखील सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत. मागील काही काळात लोकप्रतिनिधींचे एका पक्षातून दुसऱ्या पक्षात जाण्याचे प्रमाण खुपच वाढले आहे. अशा प्रकारे तळ्यात-मळ्यात करताना हे पुढारी लोक ज्यांनी आपल्याला निवडूण दिले त्या मतदारांचा विचारच करत नाहीत. याच अनुषंगाने नेत्यांचे कान टोचणारे बॅनर्स सध्या पुण्यातील अनेक भागात झळकत आहेत.(Pune Lok Sabha Election 2024)

जागृत पुणेकर, या नावाने हे बॅनर्स पुण्यातील अनेक भागात लावण्यात आले ओहत. मात्र, हे बॅनर्स नक्की कोणी लावले हे समजलेले नाही.

या बॅनर्सवर लिहिले आहे की, जागृत पुणेकरांनो, उमेदवार कोणत्याही पक्षाचा असो, त्यांना आपल्या परिचय पत्रात एकच उल्लेख करावा, की मी आमच्या पक्षाशी व पक्षाच्या ध्येय धोरणाशी आणि मतदारांशी ५ वर्ष प्रामाणिक राहीन, कोणत्याही दुसऱ्या पक्षात जाणार नाही. गेलो तर पुन्हा मला किंवा आमच्या घरातील व्यक्तीला निवडून देऊ नका. जो उमेदवार आपल्या परिचय पत्रात असे लिहिल त्यांनाच मतदान करा.

या बॅनर्सबाबत प्रतिक्रिया देताना सजग नागरिक मंचाचे (Sajag Nagrik Manch) कार्यकर्ते विवेक वेलणकर
(Vivek Velankar) म्हणाले, या बॅनर्स कोणी लावले, हे माहिती नाही. मात्र, या बॅनर्समधील मजकुराशी आम्ही
सहमत आहोत. यावरून जनतेच्या मनात नेत्यांविरोधात नाराजी आहे, हे दिसून येते.

लोकांना पक्ष आणि पक्षाच्या धोरणांशी प्रामाणिक राहणारा उमेदवार हवा आहे.
महत्त्वाचे म्हणजे बॅनर्स नाव गुपीत ठेवले आहे. यावरून लोकांच्या मनात भीती आहे, हे दिसून येते. खरं तर हे योग्य नाही.
लोकांनी राजकारण्यांना का घाबरावे?, असे वेलणकर म्हणाले.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Prakash Ambedkar On Lok Sabha Election 2024 | प्रकाश आंबेडकरांकडून नव्या समीकरणाचे संकेत, म्हणाले ”महाराष्ट्रात नव्या राजकारणाची सुरूवात…”

Pune Sadashiv Peth Crime | सदाशिव पेठेतील आणखी एका मंदिरात चोरी, दानपेटीतून रोकड लंपास