Pune Lok Sabha Election 2024 | वंचित पुण्यातून उमेदवार देणार, वसंत मोरेंना उमेदवारी देण्यास स्थानिक नेत्यांचा विरोध

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Lok Sabha Election 2024 | मनसेतून बाहेर पडलेले वसंत मोरे (Vasant More) यांनी अद्याप कोणत्याही पक्षात प्रवेश केलेला नाही. पुणे लोकसभेसाठी इच्छूक असलेले मोरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी मिळवण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर मोरे यांनी वंचित (Vanchit Bahujan Aghadi) आणि मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांचे समर्थन मिळवण्याचा प्रयत्न केला. मात्र, या प्रयत्नांना यश येताना दिसत नाही. वसंत मोरे यांनी मुंबईत जाऊन वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांची भेट घेतली होती. जरांगे यांनी मराठा समाजाचे (Marath Samaj) उमदेवार देण्याबाबत घुमजाव केल्यानंतर आता पुणे वंचितमधून मोरे यांना उमेदवारी देण्यास विरोध होत आहे. (Pune Lok Sabha Election 2024 )

दरम्यान, मोरे यांनी मुंबईत जाऊन राजगृहावर प्रकाश आंबेडकर यांची भेट घेऊन उमेदवारीसाठी इच्छूक असल्याचे सांगितले होते.

यानंतर वंचित बहुजन आघाडीच्या राज्य आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांची प्रकाश आंबेडकर यांच्याबरोबर बैठक झाली. या बैठकीत मोरे यांना पाठिंबा देण्यास स्थानिक पदाधिकाऱ्यांनी विरोध केला. मोरे यांना पाठिंबा देण्याऐवजी पक्षाचा उमेदवार उभा करावा, अशी मागणी बैठकीत करण्यात आली. त्यानुसार आता वंचितकडून उमेदवार निश्चितीबाबतची प्रक्रिया सुरू झाली आहे.

वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांचे म्हणणे आहे की, पुण्यामध्ये वंचितची ताकद आहे. पक्षाचे मतदार मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळे मोरे यांना पाठिंबा देण्याऐवजी पक्षाचा उमेदवार उभा करावा. याबाबत वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष अनिल जाधव म्हणाले की, आगामी विधानसभा आणि महापालिकेच्या निवडणुका लक्षात घेता पक्षाचा उमेदवार उभा करण्याचे निश्चित झाले आहे.

तर वंचित बहुजन आघाडीचे पश्चिम महाराष्ट्र संघटक अतुल बहुले (Atul Bahule) म्हणाले,
पुण्यातून लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे. मात्र,
उमेदवार कोण, याबाबत येत्या दोन दिवसांमध्ये निर्णय होईल. मागील लोकसभा निवडणुकीत वंचितने पुण्यातून अनिल जाधव यांना उमेदवारी दिली होती. ते ६५ हजार मते घेत तिसऱ्या स्थानावर होते.

दरम्यान, वंचितचा उमेदवार हा भाजपाच्या पथ्यावर पडणार आहे.
दलित मतांचे विभाजन झाल्यानंतर त्याचा फायदा भाजपाला होणार असल्याने वंचितचा उमेदवार
उभा राहणार ही भाजपासाठी (BJP) चांगली बातमी आहे.
तर दुसरीकडे काँग्रेससाठी वंचितचा उमेदवार खुप मोठी अडचण निर्माण करणारा ठरणार आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Cheating Fraud Case | नोकरी लावण्याच्या बहाण्याने पुण्यात युवकाला 28 लाखांचा गंडा, दाम्पत्यावर FIR

Pune Traffic Police Action On Modified Silencers | ‘बुलेट राजा’वर वाहतूक शाखेची वक्र दृष्टी! 619 बुलेट वर कारवाई, कर्कश आवाजाचे सायलेन्सर जप्त