Pune Loni Kalbhor Crime | पुणे : घरात घुसून मारहाण, हवेत कोयते फिरवून दहशत पसरवणाऱ्या सहा जणांवर FIR

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Loni Kalbhor Crime | सहा जणांच्या टोळक्याने घरात घुसून दोघांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसचे हतातील कोयते हवेत फिरवून आम्ही इथले भाई आहोत, कोणी मध्ये पडला तर त्याचा कार्यक्रम करु असे म्हणत दहशत पसरवली. हा प्रकार सोमवारी (दि.25) दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास म्हातोबाची आळंदी येथील पाटील नगर येथे घडली. याप्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी (Loni Kalbhor Police Station) सहा जणांवर विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.(Pune Loni Kalbhor Crime)

याबाबत अंजनाबाई अंकुश दांडेकर (वय-50 रा. म्हातोबाची आळंदी) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन निखिल केसरकर, रोहीत एकनाथ वाल्हेकर, पप्पु काळे व त्याच्या इतर तीन मित्रांवर आयपीसी 143, 144, 147, 148, 149, 452, 323, 504, 506, सह आर्म अॅक्ट, महाराष्ट्र पोलीस कायदा, क्रिमिनल लॉ अमेंन्डमेंट अॅक्ट नुसार गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्य़ादी यांच्या घरात घुसून त्यांच्या दोन मुलांना हाताने तसेच लाथाबुक्क्यांनी
मारहाण केली. तसेच घराच्या पत्र्यावर कोयते व दगड मारुन नुकसान केले.
यानंतर फिर्यादी व त्यांच्या मुलांना शिवीगाळ करुन घर सोडून जाण्याची धमकी दिली.
आरोपी पैकी एकाने त्याच्या हातातील कोयता हवेत फिरवुन आम्ही इथले भाई आहोत, कोणी मध्ये पडला तर त्याचा
कार्य़क्रम करु असे म्हणत दहशत पसरवली. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Shivajirao Adhalrao Patil Join NCP | शिंदे सेना सोडून आढळराव पाटील राष्ट्रवादीत दाखल, अजित पवारांनी केले स्वागत, आता कोल्हेंविरूद्ध लढणार

Drunk and Drive Action In Pune | पुणे : 142 तळीरामांवर ‘ड्रंक अँड ड्राईव्ह’ प्रकरणी गुन्हा दाखल, वाहतूक विभागाची कारवाई

Arrest In Vehicle Theft | दुचाकी चोरट्यांना दिघी पोलिसांकडून अटक, चार दुचाकी जप्त

Pune Lok Sabha Election 2024 | पुणे: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शस्त्र बाळगण्याबाबत निर्बंध लागू