Pune Mahavitaran News | महावितरणच्या स्नेहमेळाव्यात अधिकारी, कर्मचाऱ्यांची कौटुंबिक धमाल; आपुलकी अन् हास्यांतून नवऊर्जा

पुणे : Pune Mahavitaran News | एरवी ग्राहकसेवा, सुरळीत वीजपुरवठा, थकीत वीजबिल वसूली व कार्यालयीन कामात व्यस्त असणाऱ्या महावितरणच्या पुणे परिमंडलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी गुरूवारी (दि. ७) कौटुंबिक धमाल केली. लहान मुले, महिला व पुरुषांच्या गटातील विविध खेळ, महिलांसाठी खास होम मिनिस्टर स्पर्धा आदींमुळे कामाचा ताण विसरून अधिकारी व कर्मचारी यांच्यात आपुलकीची चर्चा, हास्यविनोदाने कौटुंबिक स्नेहमेळावा उत्साहात साजरा झाला.

गणेशखिंड येथील महावितरणच्या विश्रामगृह परिसरात गुरुवारी सायंकाळी ५.३० वाजता कौटुंबिक स्नेहमेळाव्याचे व जागतिक महिला दिनाचे आयोजन करण्यात आले होते. पुणे प्रादेशिक संचालक श्री. अंकुश नाळे, मुख्य अभियंता श्री. राजेंद्र पवार (पुणे), श्री. सुनील पावडे (बारामती), श्री. अनिल कोलप (महापारेषण) व महाऊर्जाचे अतिरिक्त महासंचालक श्री. पंकज तगलपल्लेवार यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमात पुणे परिमंडलातील अभियंते, अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांसह सुमारे १६०० आबालवृद्ध सहभागी झाले होते.(Pune Mahavitaran News)

स्नेहमेळाव्यातील जत्रासदृश उत्साही वातावरणात पुरुष व महिलांच्या गटात संगीत खुर्चीचा खेळ रंगला. टॅट्यू, मेंदी, महिला दिन व सुरक्षा दूताचे सेल्फी पॉईंट व इतर खेळांचा आनंद लुटला. सोबत विविध खाद्यपदार्थांची रेलचेल होती. महावितरणचे श्री. दिलीप गायकवाड यांच्या सुरेल विविध गाण्यांनी रंग भरला. तसेच सुमारे ९० महिलांच्या सहभागामुळे तब्बल दोन तास चाललेल्या होम मिनिस्टर स्पर्धेत भोसरी विभागाच्या सहायक अभियंता ज्योत्स्ना बोरकर यांनी विजेत्या म्हणून मानाची पैठणी जिंकली. तर विनिता दाणे यांनी द्वितीय व विजय गोसावी यांनी तृतीय क्रमांक पटकावला. या कार्यक्रमाचे श्री. कपिल पाटील यांनी सूत्रसंचालन केले.

पुणे-बारामती परिमंडल संघाने सलग दुसऱ्या वर्षी राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेचे अजिंक्यपद मिळवले.
त्यानिमित्त खेळाडू व संघ व्यवस्थापकांचा या मेळाव्यात पाहुण्यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
तसेच जागतिक महिला दिनानिमित्त प्रादेशिक संचालक श्री. अंकुश नाळे, मुख्य अभियंता श्री. राजेंद्र पवार
व श्री. सुनील पावडे यांनी मनोगत व्यक्त करीत महिलाशक्तीचा गौरव केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपकार्यकारी
अभियंता डॉ. संतोष पाटणी यांनी केले व आभार मानले.

या स्नेहमेळाव्यात अधीक्षक अभियंता सर्वश्री अरविंद बुलबुले, युवराज जरग, प्रकाश राऊत, सौ. पुनम रोकडे,
महाव्यवस्थापक (वित्त) सौ. माधुरी राऊत, उपमहाव्यवस्थापक (मासं) श्री. सुशील पावसकर,
सहायक महाव्यवस्थापक ज्ञानदा निलेकर, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी श्री. शिरीष काटकर (पुणे),
श्री. श्रीकृष्ण वायदंडे (बारामती) यांच्यासह अभियंता, अधिकारी, कर्मचारी कुटुंबियांसह सहभागी झाले होते.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Police Inspector Appointment | पुणे पोलिस आयुक्तालयात नव्याने हजर झालेल्या 7 पोलिस निरीक्षकांच्या नियुक्त्या

Sanjay Shirsat Slams Devendra Fadnavis | महायुतीत जुंपली! फडणवीसांना शिंदे गटाचे चोख प्रत्युत्तर, ”…तर भाजपाच्या १०५ जणांना विरोधात बसावं लागलं असतं”

Uddhav Thackeray-Rahul Narvekar | ”भाजपाने लबाड राहुल नार्वेकरला लोकसभेच्या तिकिटाचं लालुच दाखवलं, म्हणूनच…”, उद्धव ठाकरे यांचा गंभीर आरोप

Devendra Fadnavis On Supriya Sule | देवेंद्र फडणवीसांचे सुप्रिया सुळेंना जशास तसे उत्तर उत्तर, मावळ गोळीबाराचा उल्लेख करत म्हणाले…

Retired IPS Makrand Ranade | निवृत्त विशेष पोलिस महानिरीक्षक मकरंद रानडे यांची राज्य माहिती आयुक्त पदी नियुक्ती (Video)