Uddhav Thackeray-Rahul Narvekar | ”भाजपाने लबाड राहुल नार्वेकरला लोकसभेच्या तिकिटाचं लालुच दाखवलं, म्हणूनच…”, उद्धव ठाकरे यांचा गंभीर आरोप

धाराशिव : Uddhav Thackeray-Rahul Narvekar | भाजपाने या लबाड राहुल नार्वेकरला लोकसभेच्या (Lok Sabha Election 2024) तिकिटाचे लालुच दाखवले म्हणून तर त्याने तो निर्णय माझ्याविरोधात दिला नाही ना? माझा तर हा आरोप आहे की, म्हणूनच त्या लबाडाने तो निर्णय दिला. माझे आमदार, खासदार चोरले असतील पण लोकांचे प्रेम कसे काय चोराल? असा सवाल करत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपा (BJP) आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर गंभीर आरोप केला. (BJP Offer Lok Sabha Ticket To Rahul Narvekar)

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी काही दिवसांपूर्वी शिवसेना आमदार अपात्रताप्रकरणात शिंदे गटाच्या बाजूने निर्णय दिला होता. यावरून आज उद्धव ठाकरे यांनी हे गंभीर आरोप केले. ते कळंब, धाराशिव येथील सभेत बोलत होते.(Uddhav Thackeray-Rahul Narvekar)

उद्धव ठाकरे म्हणाले, माझा त्या लबाडावर आरोप आहे, होय मी राहुल नार्वेकरला लबाडच म्हणणार. कारण शिवसेना कुणाची हे त्याने जरा इथे येऊन पाहावे. हा लबाड आता भाजपाकडून लोकसभेची निवडणूक लढवतोय.

उद्धव ठाकरे म्हणाले, राहुल नार्वेकरला लालुच दिले गेले त्यामुळेच त्याने शिवसेना माझी नाही असा निकाल दिला. सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) राहुल नार्वेकरला प्रश्न विचारला आहे की तुम्ही जो निर्णय घेतलात तो आमच्या निर्णयाच्या विरुद्ध होता असे वाटत नाही का? त्यामुळे आता आम्हाला सर्वोच्च न्यायालयाकडून अपेक्षा आहे.

अमित शाह (Amit Saha) यांच्यावर टीका करताना उद्धव ठाकरे म्हणाले, अमित शाह यांना विचारा शिवसेना कुणाची.
पण ज्या देशाच्या गृहमंत्र्याला धाराशिव आणि छत्रपती संभाजी नगर हे नामांतर कुणी केले ते माहीत नाही.
ज्याला शिवसेनेचा प्रमुख कोण माहीत नाही. अमित शाह यांनीच सांगावे मातोश्रीवर २०१९ ला काय सत्यनारायणाच्या
पूजेला मातोश्रीवर आले होते का?

भाजपासह एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर टीकाक करताना
उद्धव ठाकरे म्हणाले, भाजपा, मिंधे, ‘या ठिकाणी आणि त्याठिकाणी’ बोलणारे ते सत्तर हजार कोटीवाले म्हणजे
निर्लज्ज सदासुखी आहेत. शिवसेना प्रमुख अनेक शिवसैनिकांना लहान असल्यापासून ओळखत आले आहेत,
मी देखील अनेकांना माझ्या लहानपणापासून पाहिले. आदित्य आणि तेजसही त्यांना काका म्हणत होते.
तो माणूस असा फिरतो? असा सवाल ठाकरे यांनी केला.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Police Inspector Appointment | पुणे पोलिस आयुक्तालयात नव्याने हजर झालेल्या 7 पोलिस निरीक्षकांच्या नियुक्त्या