Pune : 30 वर्षीय विवाहीतेची विहीरीत उडी मारून आत्महत्या, लोणीकंद परिसरातील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पतीच्या त्रासाला कंटाळून एका 30 वर्षीय विवाहितीने विहिरीत उडू मारून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. लोणीकंद परिसरात हा प्रकार घडला आहे.

नीलम धोंडीबा शिंदे (वय 30) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी पती धोंडीबा शिंदे व इतर दोघांवर लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत नीलम यांचा भाऊ सागर भालेराव यांनी तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नीलम व धोंडीबा यांचा 2010 मध्ये विवाह झाला होता. त्यांना दोन मुलं देखील आहेत. नीलम या गृहिणी होत्या. तर धोंडीबा हा मोलमजुरी करतो. दरम्यान पती व इतर दोघे नीलम यांना घरघुती व संशय घेऊन सतत टोचून बोलत असे. त्यांचा मानसिक व शारीरिक छळ केला जात होता. या छळाला कंटाळून नीलम यांनी चार दिवसांपूर्वी गावाच्या लगत असलेल्या विहिरीत उडी मारुन आत्महत्या केली आहे. हा प्रकार समोर आल्यानंतर सागर यांनी पोलिसांकडे तक्रार केली आहे. अधिक तपास उपनिरीक्षक दीपक जाधव हे करत आहेत.