पुणे मेट्रो प्रकल्प ; जीव जाता जाता वाचला.. !

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन –पुणे मेट्रो प्रकल्प हे या सरकारच अति महत्वाचं प्रकल्प असल्याचं मंत्री मंडळातील अनेक मंत्री नेहमी सांगत असतात ,  प्रवासाचं अंतर कमी व्हावं, आणि लांबचा पल्ला लवकर सर व्हावा या हेतूने हे काम चालू आहे यात गैर काही नाही , पण रस्त्यावर हे काम चालू असताना त्याच रस्त्याने अत्यंत मोठ्या प्रमाणावर रहदारी असते, आणि अशा रहदारी मध्ये आज पुणे येथील नाशिक फाटा या भागात मेट्रो च्या कामासाठी असलेली क्रेन अचानक रस्त्यावर कोसळली आणि एकच पळापळ झाली.

मेट्रो प्रकल्पाला विविध स्तरातून विरोध झाला अनेक विरोधी पक्षाच्या नेत्यांनी हि रस्त्यावर उतरून या प्रकल्पाला विरोध केला.  पण विरोधाला जुमानेल ते सरकार कसलं , एवढ्या महागड्या प्रकल्पा  साठी महागड्या मशिनरीज आणायच्या आणि सुरक्षा काय तर शून्य दरम्यान या सगळ्या प्रकारामध्ये कोणतीही जीवित हानी झालेली नाही, पण दोन जण किरकोळ जखमी झाल्याची प्राथमिक माहिती सूत्रांकडून मिळतेय , पोलीस तिथे पोहचले सोबतच प्रकल्पाचे अधिकारी ही आहे आणि ती क्रेन बाजूला सरकवण्याचे काम करत आहे .उर्वरित तपासणी चालू आहे, या गोंधळामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली असून परिस्तिथी नियंत्रणात आणायचं काम पोलीस करतायेत.