Pune Metro Rail | नवीन वर्षाच्या निमित्ताने पुणे मेट्रोच्या प्रवासी सेवेचा विस्तार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Metro Rail | प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन महामेट्रोने नवीन वर्षात पुणे मेट्रोच्या प्रवासी सेवेचा विस्तार करण्याची घोषणा केली आहे. यामुळे पिंपरी-चिंचवड महानगरपालिका ते जिल्हा न्यायालय आणि वनाझ ते रुबी हॉल या मार्गावरील फेऱ्यांची संख्या वाढवण्यात येणार आहे. (Pune Metro Rail)

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते पुणे मेट्रोच्या (Pune Metro Rail) गरवारे कॉलेज स्थानक
(Garware College Station) ते रुबी हॉल स्थानक (Ruby Hall Station) आणि फुगेवाडी स्थानक ते सिव्हिल कोर्ट
स्थानक (Civil Court Station) या मार्गाचे लोकार्पण होऊन या मार्गावर प्रवासी सेवेचा विस्तार झाला.
पुणे मेट्रोच्या पहिल्या टप्प्यातील मार्गिका 1 (पिंपरी चिंचवड महानगरपालिका (PCMC) ते स्वारगेट-Swargate)
आणि मार्गीका 2 (वनाझ ते रामवाडी) मिळून एकूण 24 कमी मार्गावर प्रवासी सेवा सुरु झाली आहे.
उर्वरित 9 कमी मार्गाचे काम पूर्णत्वाकडे आले असून लवकरच पुणे मेट्रोची पहिल्या टप्प्यातील संपूर्ण मार्गिका
प्रवाशांसाठी खुली करण्यात येणार आहे.

लोकांमधील पुणे मेट्रोचा प्रवासासाठी होणारा वाढता वापर आणी नवीन वर्षाच्या (New Year) निमित्ताने पुणे मेट्रे
आपल्या प्रवासी सेवेचा विस्तार करीत आहे. पुणे मेट्रोची सेवा सकाळी 6 ते रात्री 10 या वेळेत सुरु असते.
यामध्ये सकाळी 6 ते सकाळी 8 या वेळेत मेट्रोच्या दर 15 मिनिटांच्या वारंवारतेने मार्गिका 1 व मार्गिका 2 वर 9 फेऱ्या,
सकाळी 8 ते 11 दर 10 मिनिटांच्या वारंवारतेने मार्गिका 1 वर 17 तर मार्गिका 2 वर 9 फेऱ्या, सकाळी 11 ते दुपारी 4
या वेळेत दर 15 मिनिटांच्या वारंवारतेने मार्गिका 1 व मार्गिका 2 वर 25 फेऱ्या आणि रात्री 8 ते रात्री 10 या वेळेत दर 15 मिनिटांनी वारंवारतेने मार्गिका 1 वर 10 व मार्गिका 2 वर 8 फेऱ्या होत होत्या.

पण आता प्रवाशांची वाढती संख्या आणि प्रवाशांच्या सोयीसाठी नवीन वर्षाच्या निमित्ताने पुणे मेट्रो प्रवासी सेवेचा
विस्तार करीत आहे. 1 जानेवारी 2024 पासून मेट्रो दोन्ही मार्गिकांवर सकाळी 6 ते सकाळी 8 या वेळेत मेट्रो दर 10
मिनिटांच्या वारंवारतेनी मार्गिका 1 व मार्गिका 2 वर 12 फेऱ्या, सकाळी 8 ते 11 दर 7.5 मिनिटांच्या वारंवारतेनी मार्गिका
1 व मार्गिका 2 वर 24 फेऱ्या, सकाळी 11 ते दुपारी 4 या वेळेत दर 10 मिनिटांच्या वारंवारतेनी मार्गिका 1 वर 32 व
मार्गिका 2 वर 30 फेऱ्या, दुपारी 4 ते रात्री 8 या वेळेत दर 7.5 मिनिटांच्या वारंवारतेनी मार्गिका 1 व मार्गिका 2 वर 32
फेऱ्या आणि रात्री 8 ते रात्री 10 या वेळेत दर 10 मिनिटांच्या वारंवारतेनी मार्गिका 1 व मार्गिका 2 वर 13 फेऱ्या
प्रत्येक स्थानकावरून उपलब्ध होणार आहे.

यामुळे प्रवाश्यांच्या प्रतिक्षेचा कालावधी कमी होऊन त्यांच्या वेळेची बचत होईल.
त्याचबरोबर मेट्रोची दिवसांमधील वारंवारता वाढणार आहे. या आधी दिवसभरात मार्गिका 1 वर 81 फेऱ्या होत होत्या,
तर 1 जानेवारी 2024 पासून 113 फेऱ्या होणार आहेत आणि मार्गिका 2 वर 80 फेऱ्या होत होत्या,
तर 1 जानेवारी 2024 पासून 111 फेऱ्या होणार आहेत.

गर्दीच्या वेळात मार्गिका 1 व 2 वर 6 मेट्रो ट्रेन कार्यान्वित आहेत, तर 1 जानेवारी 2024 पासून मार्गिका 1 व 2 वर 8 मेट्रो
ट्रेन कार्यान्वित होणार आहेत. तसेच कमी गर्दीच्या वेळात मार्गिका 1 व 2 वर 4 मेट्रो ट्रेन सध्या कार्यान्वित आहेत.
1 जानेवारी 2024 पासून कमी गर्दीच्या वेळेत मार्गिका 1 व 2 वर 6 मेट्रो ट्रेन कार्यान्वित होणार आहेत.

महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर (Mahametro MD Shravan Hardikar) म्हणाले 1 जानेवारी 2024
पासून होणाऱ्या प्रवासी सेवेच्या विस्तारामुळे मेट्रोच्या प्रवासी वेळेत जास्तीत जास्त लोकांना प्रवास करणे शक्य होणार आहे
व वेळेची देखील बचत होणार आहे. सकाळी व संध्याकाळी ऑफिस जाण्याच्या/येण्याच्या वेळेत होणारी गर्दी कमी होईल.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune PMC News | पाणीपट्टी थकविणारी शासकिय कार्यालये व कॅन्टोंन्मेंट बोर्डचा पाणी पुरवठा बंद करणार – महापालिका आयुक्त विक्रम कुमार

Manoj Jarange Patil | ”राजकारणात माणूस गेला की मतलबी बनतो, आमचा तो रस्ता नाही”, मनोज जरांगेंचे थेट उत्तर