Pune MNS | केंद्र सरकारकडून PFI वर बंदी, मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची अमित शहांकडून मागणी पूर्ण, पुण्यात मनसेनं फटाके फोडत वाटले मोतीचूर लाडू (व्हिडिओ)

0
520
Pune MNS | pfi ban maharashtra navnirman sena celebrates burst crackers in pune after union home minister amit shah accepts raj thackeray demand
file photo

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – PFI म्हणजे पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (Popular Front of India) संघटनेच्या नेत्यांनी देशात धरपकड सुरु झाल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी ठिकठिकाणी निषेध व्यक्त केला होता. यादरम्यान PFI च्या समर्थकांनी पुण्यात ‘पाकिस्तान जिंदाबाद’च्या घोषणा (Pakistan Zindabad Slogan) दिल्याचे व्हिडिओ व्हायरल झाले. त्यानंतर याविरोधात मनसे (Pune MNS) आक्रमक झाली होती. त्यामुळे आज PFI संघटनेवर केंद्रीय गृहमंत्रालयाने बंदी घालण्याचा निर्णय घेतल्यानंतर मनसेने (Pune MNS) फटाके फोडत आणि मोतीचूर लाडू वाटत निर्णयाचे स्वागत केले.

यावेळी पुणे मनसे (Pune MNS ) शहर अध्यक्ष साईनाथ बाबर (City President Sainath Baba), अजय शिंदे (Ajay Shinde), सारंग सराफ (Sarang Saraf), बाबू वागसकर (Babu Wagaskar), मनसेच्या महिला पदाधिकारी कार्यकर्त्या व शहरातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

मागील आठवड्यात केंद्रीय तपास यंत्रणांनी (Central Investigative Agencies) देशातील PFI च्या विविध कार्यालयांवर छापेमारी केली होती. पुण्यात देखील अशाच प्रकारची छापेमारी करण्यात आली होती.
त्याच्या निषेधार्थ PFI च्या वतीने पुण्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन (Agitation) केले होते.
या आंदोलनाच्या वेळी पाकिस्तान झिंदाबादचे नारे लगावल्याचा आरोप झाला होता.
यानंतर मनसेकडून PFI चा निषेध करत संघटनेवर बंदीसाठी आंदोलन केले होते.
आज बंदी आणल्यानंतर पुणे मनसेच्या (Pune MNS) वतीने अलका चौकात जल्लोष साजरा करण्यात आला.

पाकिस्तान जिंदाबाद म्हणणाऱ्या PFI या संघटनेवर मनसेच्या आंदोलनामुळे त्वरीत बंदी घातली गेली.
पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे (Party chief Raj Thackeray) यांनी सर्वप्रथम ही भूमिका मांडली होती.
आणि मग आम्ही मोठं आंदोलन केलं आणि सरकारला याची दखल घ्यावी लागली.
आज आम्ही PFI या संघटनेवर बंदी घातली म्हणून जल्लोष साजरा केल्याचे मनसे नेते प्रशांत कानोजिया (Prashant Kanojia) यांनी सांगितले.

Web Title :- Pune MNS | pfi ban maharashtra navnirman sena celebrates burst crackers in pune after union home minister amit shah accepts raj thackeray demand

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pankaja Munde | ‘…तर मोदीही मला संपवू शकत नाही’, पंकजा मुंडेंच्या वक्तव्यावर विधानसभेचा दाखला देत बंधू धनंजय मुंडे म्हणाले…