Pune : बिबवेवाडीतील मोबाईल दुकान फोडणारे अटकेत

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  बिबवेवाडी परिसरातील मोबाईलचे दुकान फोडून विविध कंपनीचे १६ मोबाईल, मोबाईल कव्हर, मोबाईलचे सुटे भाग आणि लॅपटॉप आदी मुद्देमाल चोरणा-या दोन चोरट्यांना बिबवेवाडी पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने त्यांना १७ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

सोहेल कादर शेख (वय २३, रा. शिवतेज नगर, गल्ली क्र.४, अप्पर बिबवेवाडी) आणि जितेंद्र शंकर चिंधे ( वय २७, दत्तनगर, जांभुळवाडी रोड, कात्रज) अशी अटक आरोपींची नावे आहेत. या प्रकरणी जितेंद्र राजाराम मन्हेर (वय ३५, पापळ वस्ती, बिबवेवाडी ) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बिबवेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादींचे बिबवेवाडी गावठाण भागातील कमानीजवळ मोबाईल दुरूस्ती- विक्रीचे दुकान आहे. ७ मार्च रोजी दुकान फोडून चोरट्यांनी रोख रक्कम, दुरूस्तीसाठी आलेले मोबाईल, कव्हर्स सुटे भाग असा ४२ हजारांचा मुद्देमाल चोरून नेला होता. या प्रकरणी बिबवेवाडी पोलिसांनी तपास करीत सोहेल आणि जितेंद्र चिंधे या दोघांना अटक केली. त्यांच्याकडून चोरी केलेला माल जप्त करण्यात आला आहे. यासह दोन कटावण्या आणि गज जप्त करण्यात आला आहे. पुढील तपासासाठी त्यांना ७ दिवसांची पोलीस कोठडी द्यावी अशी मागणी सरकारी वकील संध्या काळे यांनी केली होती.