Pune Molestation Case | ‘किस पाहिजे का’? शिक्षकाकडून महाविद्यालयीन तरुणीचा विनयभंग, वानवडी परिसरातील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Molestation Case | शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यात शिक्षकीपेशाला काळीमा फासणारी घटना समोर आली हे. एका शिक्षकानेच महाविद्यालयात शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीला कॉलेजच्या स्टाफ रुमध्ये बोलावून घेत ‘किस पाहिजे का’ असे म्हणत विनयभंग केला. याप्रकरणी वानवडी पोलिसांनी (Wanwadi Police) शिक्षकावर पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करुन आरोपीला अटक केली आहे. (Pune Crime News)

याबाबत पीडित 17 वर्षीय अल्पवयीन मुलीने मंगळवारी (दि.30) वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन रमेश किसन चव्हाण Ramesh Kisan Chavan (वय-32 रा. भेकराई नगर, हडपसर) याच्यावर आयपीसी 354(ड) सह पोक्सो अॅक्ट कलम 9(फ), 10, 12 नुसार गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. हा प्रकार 15 जून 2023 ते 27 जानेवारी 2024 या कालावधीत वानवडी येथील एका महाविद्यालयात घडला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी वानवडी येथील एका महाविद्यालयात शिक्षण घेते.
त्याच महाविद्यालयात आरोपी रमेश चव्हाण हा शिक्षक आहे.
आरोपीने पीडित तरुणीच्या मोबाईलवर वारंवार आय लाईक यु, आय लव यू असे मेसेज पाठवून त्रास दिला.
तिला व्हिडिओ कॉल करुन तिच्यासोबत अश्लील बोलून मानसिक त्रास दिला.
तसेच आरोपीने पीडित तरुणीला कॉलेजमधील शिक्षकांच्या स्टाफ रुममध्ये बोलावून घेतले.
पीडित तरुणी स्टाफ रुममध्ये आली असता ‘किस पाहिजे का’ अशी विचारणा करुन तरुणीच्या स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संतोष गायकवाड करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

ACB Trap Case | मंडल अधिकारी घेतात हॉटेलमध्ये तर तलाठी कार्यालयात; वारसांची नावे लावण्यासाठी लाच घेताना एकाचवेळी केली दोन ठिकाणी कारवाई

Pune ACB Trap News | पुणे : लाच घेताना पुण्यातील महसूल सहाय्यक अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

MLA Anil Babar Death | शिवसेनेचे आमदार अनिल बाबर यांचे निधन

Gang Rape In Pune | खळबळजनक! पुण्यात 15 वर्षाय अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, दोघांना अटक

Pune Loni Kalbhor Crime | पुणे : आधार कार्ड काढून देण्याच्या बहाण्याने नेऊन तरुणीवर बलात्कार, आरोपीला अटक