Pune-Mumbai Road Widening | पुणे मुंबई रस्ता रुंदीकरणासाठी भूसंपादनातील शेवटचा अडथळा दूर ! पंजाब हॉटेल व स.नं. 105 मधील भूसंपादनावरील स्थगिती उच्च न्यायालयाने उठविली

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Pune-Mumbai Road Widening | पुणे मुंबई जुन्या महामार्गावरील (Pune Mumbai Old Highway) खडकी कॅन्टोंन्मेंट (Khadki Cantonment Board) परिसरातील रस्ता रुंदीकरणाचा मार्ग मोकळा झाल्याने लवकरच या मार्गावरील वाहतूक कोंडीतून (Traffic Jam In Khadki) सुटका होणार आहे. येथील एका हॉटेल आणि चित्रपटगृहाच्या भूसंपादनाबाबत उच्च न्यायालयाने (Bombay High Court) दिलेली स्थगिती आज उठविल्याने सर्व अडचणी संपल्या आहेत. अवघ्या आठ दिवसांमध्ये गणेशखिंड रस्ता (Ganesh Khind Road) रुंदीकरणातील वृक्षतोडीच्या परवानगीसोबतच पुणे मुंबई महामार्गाच्या रुंदीकरणासाठी भूसंपादनाचा कायदेशीर अडथळा दूर करण्यासाठी महापालिकेच्या विधी आणि पथ विभागाने केलेल्या प्रयत्नांना यश आले आहे.(Pune-Mumbai Road Widening)

पुणे मुंबई महामार्गावर पिंपरी चिंचवड ते खडकी (Pimpri Chinchwad To Khadki) दरम्यानचा मेट्रो (Pune Metro) उन्नत मार्ग करण्यात आला आहे. यामुळे महामार्गाची रुंदी वाढविण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला. प्रामुख्याने बोपोडी ते खडकी दरम्यान असलेल्या वसाहती आणि मिळकतींच्या भूसंपादनामुळे दीर्घकाळ रुंदीकरण लटकले होते. प्रशासनाच्यावतीने जाणीवपूर्वक प्रयत्न करून निवासी मिळकती ताब्यात घेण्यात आल्या आणि त्याठिकाणी रुंदीकरणही करण्यात आले होते. परंतू स.नं. १०५ येथील पंजाब हॉटेल (Hotel Punjab Pune) आणि जयहिंद चित्रपटगृह (Jai Hind Cinema Khadki) या कॅन्टोंन्मेट बोर्डने लीजवर दिलेल्या वास्तुंच्या मोबदल्याच्या रकमेवरून वाद होते. प्रशासनाने त्रयस्थ संस्था म्हणून पिंपरी चिंचवड महापालिका, सार्वजनिक बांधकाम विभागाकडूनही मुल्यमापन करून घेतले होते. परंतू हे मुल्यमापन मान्य नसल्याने पंजाब हॉटेलचे संचालक महापालिकेविरोधात Pune Municipal Corporation (PMC) उच्च न्यायालयात गेले होते. जयहींदचे संचालकही या याचिकेत प्रतिवादी होते. उच्च न्यायालयाने या भूसंपादनाला स्थगिती दिली होती.

उच्च न्यायालयाचे न्यायमुर्ती नितीन जामदार (Justice Nitin Jamdar) आणि एम. एम. साठ्ये (Justice MM Sathaye) यांच्या बेंचपुढे आज यावर सुनावणी झाली. न्यायालयाने सार्वजनिक बांधकाम विभागाने मुल्यमापन केल्यानुसार मोबदल्याची रक्कम न्यायालयात जमा करण्याचे आदेश देतानाच भूसंपादनावरील स्थगिती उठविली. महापालिकेच्यावतीने ऍड. अभिजित कुलकर्णी (Adv Abhijeet Kulkarni) आणि पुणे कॅन्टोंन्मेटच्यावतीनेही (Pune Cantonment Board) त्यांच्या वकिलांनी बाजू मांडली, अशी माहिती महापालिकेच्या विधी सल्लागार निशा चव्हाण (Adv Nisha Chavan) यांनी दिली. यावेळी पथ विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर (Aniruddha Pawaskar PMC) हे देखिल न्यायालयात उपस्थित होते.

उच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे पंजाब हॉटेल आणि जयहींद चित्रपटगृहासमोरील रस्ता रुंदीकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे. उर्वरीत संपुर्ण रस्त्याचे रुंदीकरण यापुर्वीच करण्यात आले आहे. केवळ येथील भूसंपादनामुळे काम रखडल्याने या मार्गावरील वाहतूक खडकी बाजार येथून वळविण्यात आल्याने वाहतूक संथ होउन कोंडीत भर पडत होती. न्यायालयाच्या आदेशानुसार भूसंपादनाची प्रक्रिया लवकरात लवकर करून रस्ता रुंदीकरणाचे काम तातडीने पुर्ण करण्यात येईल, अशी माहिती महापालिकेच्या अधिकार्‍यांनी दिली. मागील आठवड्यात न्यायालयाने गणेशखिंड रस्ता रुंदीकरणात बाधा ठरणारे वृक्ष काढण्यावरील स्थगिती उठविली. पाठोपाठ आज पुणे मुंबई रस्त्याच्या रुंदीकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे. यासाठी महाापलिकेच्या विधी आणि पथ विभागाने विशेष प्रयत्न केले.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Vasant More-Pune Lok Sabha | पुणे लोकसभेसाठी वंचित बहुजन आघाडीकडून वसंत मोरे यांनी भरला अर्ज

Pune Police Seized Firearms | पुणे पोलिसांकडून 42 पिस्तुल, 74 जिवंत काडतुसे जप्त; 28 गुन्हेगार गजाआड

JM Road Firing Case Pune | पुण्यात बापानेच दिली मुलाला गोळ्या घालण्यासाठी 75 लाखाची सुपारी! पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितली हकीकत, धक्कदायक कारण आलं समोर (Video)