Vasant More-Pune Lok Sabha | पुणे लोकसभेसाठी वंचित बहुजन आघाडीकडून वसंत मोरे यांनी भरला अर्ज

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Vasant More-Pune Lok Sabha | लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला (Maharashtra Navnirman Sena – MNS) रामराम करून वंचित बहुजन आघाडीतर्फे (Vanchit Bahujan Aghadi-VBA) निवडणूक लढविणारे वसंत मोरे यांनी बुधवारी (दि.24) जिल्हाधिकारी कार्यालयात (Pune Collector Office) जाऊन उमेदवारी अर्ज दाखल केला. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी वसंत मोरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी भव्य शक्तीप्रदर्शन केले.(Vasant More-Pune Lok Sabha)

लोकसभेची निवडणूक लढविण्यास इच्छुक असतानाही पक्षातील स्थानिक पदाधिकाऱ्यांनी नकारात्मक अहवाल दिल्यामुळे मोरे यांनी मनसेचा राजीनामा दिला होता. महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi-MVA) काँग्रेसकडून (Congress) उमेदवारी मिळविण्याचा प्रयत्न त्यांनी केला होता. मात्र त्यांना महाविकास आघाडीकडून उमेदवारी नाकारण्यात आली. त्यानंतर वंचित बहुजन विकास आघाडीच्या माध्यमातून उमेदवारीसाठी त्यांनी जोरदार प्रयत्न केले होते. वंचित बहुज विकास आघाडीचे संस्थापक अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांची त्यांनी भेट घेतली आणि त्यानंतर मोरे यांच्या नावाची घोषणा केली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Amol Kolhe | केंद्रातील सरकार बदलणार, काळ्या दगडावरची रेष – डॉ. अमोल कोल्हे

Maval Lok Sabha | मावळ लोकसभा निवडणुकीसाठी निवडणूक निरीक्षकांची नियुक्ती

Baramati Pune Crime | पुणे : वाढीव वीज बिलाच्या कारणावरुन महिला कर्मचाऱ्यावर कोयत्याने वार, उपचारादरम्यान मृत्यू