Pune Mundhwa Police | घराची वाट चुकलेल्या ज्येष्ठ नागरिकाची मुंढवा पोलिसांनी घडवली कुटूंबियांची भेट

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Mundhwa Police | मुंढवा पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक शुभांगी मगदुम व स्टाफ पायी पेट्रोलिंग करत असताना एक 66 वर्षीय ज्येष्ठ नागरिक मुंढवा-घोरपडी रोड वरून जाताना दिसले. ते आस्थाव्यस्त, हुरहूरल्यागलत फिरत असल्याचे दिसले. पोलिसांनी त्यांच्या जवळ जाऊन विचारपूस करुन मदत पाहिजे अशी विचारणा केली. त्यावेळी त्या ज्येष्ठ नागरिकाचे डोळे भरून आले. त्यांनी एकही शब्द न बोलता होकारार्थी मान हलवली. त्यानंतर पोलिसांनी त्यांच्या कुटुंबियांचा शोध घेऊन त्याची कुटूंबियांची भेट घडवून आणली.(Pune Mundhwa Police)

कमरुद्दीन रसुल इनामदार (वय- 66 रा. अॅमेनोरा पार्क, मुंढवा) असे या ज्येष्ठ नागरिकाचे नाव आहे. मुंढवा पोलिसांनी त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांना अॅमेनोरा पार्क एवढेच सांगता आले. तसेच त्यांच्याकडे ओळख पटविण्याकरीता मोबाईल फोन, ओळखत्र, काहीच नव्हते. त्यामुळे पोलिसांनी कमरुद्दीन यांना पोलीस ठाण्यात आणले. या घटनेची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बोळकोटगी यांना देण्यात आली.

पोलिसांच्या पथकाने आजोबा सांगत असलेल्या भागात त्यांच्या नातेवाकांचा शोध घेतला.
दरम्यान पोलिसांनी त्यांना धीर देत तुम्हा सुखरुप घरी सोडू असे सांगितले. तसेच त्यांचा मुलगा सुरज इनामादार याच्याशी संपर्क झाल्याने पोलिसांनी त्याला पोलीस ठाण्यात बोलावून घेतले. आजोबांची ओळख पटवून खात्री झाल्याने त्यांना सुखरूप कुटुंबियांच्या स्वाधीन करण्यात आले. वडील सुखरुप मिळाल्याने मुलगा सुरज याने मुंढवा पोलिसांचे आभार मानले.

ही कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पोलीस सह आयुक्त प्रविण पवार, अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिकविभाग
मनोज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपायुक्त आर राजा, सहायक पोलीस आयुक्त अश्विनी राख याच्या
सुचनेनुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बोळकोटगी, पोलीस उपनिरीक्षक शुभांगी मगदुम, पोलीस अंमलदार नवनाथ
कोकरे, निलेश पालवे, पुनम लाड व इतर कर्मचाऱ्यांनी केली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

अंतरवाली सराटीत गोंधळ, फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केल्यानंतर जरांगे निघाले मुंबईतील सागर बंगल्यावर