Manoj Jarange Patil | अंतरवाली सराटीत गोंधळ, फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केल्यानंतर जरांगे निघाले मुंबईतील सागर बंगल्यावर

मुंबई : मराठा आरक्षण (Maratha Reservation) आंदोलनाचे नेते मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांनी आज अंतरवाली सराटीत मराठा समाजाच्या बैठकीत राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर गंभीर आरोप केले. फडणवीस माझा एन्काउंटर करण्याचा प्रयत्न करत आहेत, मला सलाईनमधून विष देण्याचा प्रयत्न करत आहेत. तुम्हाला मला मारायचंच असेल, तर मी सागर बंगल्यावर येतो, मला मारून दाखवा, असे जरांगे यांनी म्हटले. यानंतर ते बैठकीतून उठून अचानक मुंबईतील सागर बंगल्याकडे निघाले, यामुळे एकच गोंधळ उडाला.

आज अंतरवाली सराटीमध्ये झालेल्या मराठा समाजाच्या बैठकीत जरांगे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर खळबळजनक आरोप केले. जरांगे म्हणाले, राज्यात जे काही चालू आहे, ते फडणवीसांमुळेच सुरू आहे. फडणवीसांच्या म्हणण्याशिवाय काहीही होत नाही. सगेसोयरे अध्यादेश काढण्यासाठी किंवा मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यास त्यांचा विरोध आहे.

जरांगे म्हणाले, तुम्हाला माझा बळी पाहिजे, तर मी सागर बंगल्याकडे येतो. यावेळी, मधेच माझा बळी गेल्यास मला सागर बंगल्यावर नेऊन टाका, असे जरांगे म्हणाले. सागर हे देवेंद्र फडणवीस याचे मुंबईतील निवासस्थान आहे.

यानंतर भाषण सुरू असताना अचानक जरांगे यांनी अंगावरील ब्लँकेट बाजुला सारुन सलाईनच्या पट्ट्या काढून टाकण्यास सांगितले. सहकाऱ्यांना त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला. परंतु, ते तडक मुंबईकडे निघाले. यानंतर ते एका कारमध्ये बसले. बराच वेळ हा गोंधळ सुरू होता.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

भाजपा आमदार प्रसाद लाड यांचे जरांगेंवर टीकास्त्र, ”फडणवीस यांचे मराठा समाजावर अनंत उपकार, तरीही…”