Pune Municipal Corporation News | नव्याने समाविष्ट झालेल्या 23 गावांमधील कागदपत्रे ताब्यात घेण्याचे पालिका आयुक्तांचे आदेश

पुणे न्यूज (Pune News) : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) –  पुणे महापालिकेच्या (Pune Municipal Corporation) हद्दीत नव्याने समाविष्ट झालेल्या 23 गावांमधील दफ्तरे ताब्यात घेण्याचे आदेश (PMC Including Villages Documents Taken) पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार (PMC Commissioner Vikram Kumar) यांनी दिले आहेत. पुणे महापालिकेतील (PMC) 8 क्षेत्रीय कार्यालयात (Ward Office) 23 गावांचा समावेश करण्यात आला आहे. या क्षेत्रीय कार्यालयातील सहाय्यक आयुक्तांनी (Assistant Commissioner) 23 गावांच्या ग्रामपंचायतींची कागदपत्रे ताब्यात (Gram Panchayat Documents Taken) घ्यावीत असे असे आदेश दिले आहेत. तसेच कागदपत्रे ताब्यात घेताना संबंधित ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांची मदत घेण्यास सांगितले आहे. Pune Municipal Corporation News | pune municipal commissioner vikram kumar orders to seize documents from 23 newly included villages

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

पुणे पालिकेच्या (Pune Municipal Corporation) हद्दीत 23 गावांचा समावेशाची अधिसूचना (Notification) राज्य सरकारने (State Government) काढल्याने संबंधित गावांवर पालिकेचे नियंत्रण राहणार आहे. या पार्श्वभूमीवर पालिका आयुक्त विक्रम कुमार (PMC Commissioner Vikram Kumar) 8 क्षेत्रीय कार्यालयांच्या (Ward Office) सहाय्यक आयुक्तांना ग्रामपंचायतीचे सर्व कार्यालयीन कामकाजाशी निगडीत सर्व कागदपत्रे ताब्यात घेण्याचे आदेश बुधवारी दिले आहेत. तसेच याचा अहवाल सादर करण्याचे आदेश आयुक्त विक्रम कुमार (PMC Commissioner Vikram Kumar) यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. ग्रामपंचायतीच्या विविध विभागातील कामकाज संबंधित ग्रामपंचायत कार्यालयातून करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

 

क्षेत्रिय कार्यालताय (Ward Office) समावेश झालेली गावे

1. हडपसर-मुंडवा क्षेत्रिय कार्यालय (Hadapsar – Mundhwa Ward Office)
– औताडे-हांडेवाडी (Autade-Handewadi), होळकरवाडी (Holkarwadi), शेवाळेवाडी (Shewalewadi), मांजरी बुद्रुक (Manjari Budruk)

2. वारजे- कर्वेनगर क्षेत्रिय कार्यालय (Warje Karvenagar Ward Office)
– कोंढवे – धावडे (Kondhve – Dhavade), कोपरे (Kopare)

3. कोंढवा-येवलेवाडी क्षेत्रिय कार्यालय (Kondhwa Yewalewadi Ward Office)
– गुजर निंबाळकरवाडी (Gujar Nimbalkarwadi), पिसोळी (Pisoli), वडाची वाडी (Vadachi Wadi)

4. नगररोड-वडगावशेरी क्षेत्रिय कार्यालय (Nagar Road Ward Office)
– वाघोली (Wagholi)

5. धनकवडी-सहकारनगर क्षेत्रिय कार्यालय (Dhankawadi – Sahakar Nagar Ward Office)
– जांभुळवाडी (Jambhulwadi, कोलेवाडी (Kolewadi), मांगडेवाडी (Mangdewadi), भिलारेवाडी (Bhilarewadi)

6. सिंहगड रोड क्षेत्रिय कार्यालय (Sinhagad Road Ward Office)
– नांदेड (Nanded), किरकिटवाडी (Kirkitwadi), खडकवासला (Khadakwasla), नांदोशी (Nandoshi), सणसनगर (Sanasnagar), नऱ्हे (Narhe)

7. औंध-बाणेर क्षेत्रिय कार्यालय (Aundh – Baner Ward Office)
– म्हाळुंगे (Mahalunge), सूस (Sus)

8. कोथरुड-बावधन क्षेत्रिय कार्यालय (Kothrud – Bavdhan Ward Office)
– बावधन बुद्रुक (Bavadhan Budruk)

Web Title : Pune Municipal Corporation News | pune municipal commissioner vikram kumar orders to seize documents from 23 newly included villages

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Gold Price Today | खूशखबर ! सोन्या-चांदीच्या दरात घसरण ! 10,000 रुपयांनी स्वस्त मिळतंय Gold, जाणून घ्या आजचे दर