Pune Municipal Corporation (PMC) | किवळे येथील होर्डिंग दुर्घटनेनंतर पुणे महापालिकेला आली जाग, विनापरवाना जाहीरात फलकांवर करणार कारवाई

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Municipal Corporation (PMC) | पिंपरी चिंचवड महापालिकेच्या हद्दीत किवळे येथील होर्डिंग कोसळून (Kiwale Iron hoarding collapses) पाच जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. या दुर्घटनेनंतर पुणे महानगरपालिका अॅक्शन मोडवर आली आहे. पुणे शहरातील मंगळवार पेठेतील शाहीर अमर शेख चौकातील (Shaheer Amar Sheikh Chowk) रेल्वेच्या जागेत असणारे मोठे जाहिरात फलकासाठी (Advertisement Board) पालिकेची परवानगी घेतली नसल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी पुणे महानगरपालिकेच्या (Pune Municipal Corporation (PMC) आकाशचिन्ह विभागाने रेल्वे विभागाकडून (Railway Department) खुलासा मागवला आहे. दरम्यान, पुण्यात लावण्यात आलेल्या अनधिकृत होर्डिंगवर (Unauthorized Hoarding) पालिकेकडून कारवाई केली जात आहे. होर्डिंगच्या स्ट्रक्चर स्टॅबिलिटी प्रमाणपत्राची (Hoarding Structure Stability Certificate) फरपडताळणी करण्याचा निर्णय पुणे महापालिका प्रशासनाने घेतला आहे.

 

किवळे येधे होर्डिंग पडून पाच जणांचा मृत्यू झाला. अशा प्रकारची घटना पाच वर्षापूर्वी मंगळवार पेठेतील शाहीर अमर शेख चौकात (जुना बाजार) घडली होती. 2018 मध्ये रेल्वेच्या हद्दीत उभारण्यात आलेले दोन मोठे जाहीरात फलक कोसळून चार जणांना जीव गमवावा लागला होता. या घटनेनंतर रेल्वे प्रशासनाने या भागातील सर्व होर्डिंग काढले होते. परंतु गेल्या वर्षभरात याठिकाणी पुन्हा होर्डिंग उभे करण्यात आले आहेत. हे होर्डिग उभारताना संबंधितांनी पुणे महानगरपालिकेच्या (Pune Municipal Corporation (PMC) आकाशचिन्ह विभागाची परवानगी घेतली नसल्याचा दावा आकाशचिन्ह विभागाचे प्रमुख माधव जगताप (Madhav Jagtap) यांनी केला आहे.

यासंदर्भात रेल्वे प्रशासनाकडून खुलासा मागण्यात आला असून सात दिवसात खुलासा सादर केला नाही तर पुढील करावाई केली जाणार आहे. ही जागा रेल्वेच्या मालकीची असल्याने परवानगी घेण्याची गरज नसल्याचा दावा रेल्वे प्रशासनाकडून यापूर्वी करण्यात आला आहे. मात्र, या जाहीरात फलकांची समोरची बाजू ही महापालिकेच्या रस्त्याकडे असल्याने त्यांनी ही परवानगी घेणे आवश्यक असल्याचे जगताप यांनी सांगितले. तसेच रेल्वेच्या जागेत बसविण्यात आलेले एलएडी जाहिरात (LAD Advertising) फलकही काढण्यासाठी त्यांना नोटीस पाठविण्यात येणार आहे. एलएडी जाहिरात फलक लावण्यासंदर्भात नियमावली असुन, त्याचे पालन रेल्वे प्रशासनाकडून केले गेल नाही असा दावाही जगताप यांनी केला.

 

पालिका करणार स्ट्रक्चर स्टॅबिलीटीची फेरतपासणी
पुणे शहरात लावण्यात येणाऱ्या होर्डिगच्या परवान्याचे प्रत्येकवर्षी नुतनीकरण (Renewal of License) केले जाते.
नुतनीकरण करताना, संबंधित जाहीरातदार व्यावसायिकाने होर्डिंगचे स्ट्रक्चर स्टॅबिलीटीचे प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे.
याशिवाय त्यांच्याकडून शपथपत्रही घेतले जाते. तुर्तास अतिक्रमण विभागाकडे स्ट्रक्चर स्टॅबिलिटी तपासणीसाठी
कोणतीही स्वतंत्र व्यवस्था नसल्याने ती पुढील काळात उभी केली जाणार आहे.
यामध्ये दोषी आढळून येणाऱ्यांवर कारवाई केली जाईल असेही जगताप यांनी सांगितले.

 

समाविष्ट गावांतच अनधिकृत होर्डींग
पुणे शहरामध्ये सध्या दोन हजार 629 अनधिकृत होर्डिंग आहेत. मागील वर्षात 953 होर्डिंगवर कारवाई करण्यात आली होती.
पोलिसांकडे (Pune Police) 508 गुन्हे दाखल केले असून, 493 तक्रारी या पोलिसांकडे दिल्या आहेत.
या कारवाईत तब्बल 75 लाख रुपयांचा दंड वसुल करण्यात आला असून सध्या शहरात 2 हजार 485 अधिकृत होर्डिंग आहेत.

 

Web Title :- Pune Municipal Corporation (PMC) | After the hoarding incident in Kiwale, Pune Municipal Corporation woke up, action will be taken against billboards advertising without license

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Ajit Pawar | ‘अजित पवारांचं वक्तव्य हे फूलस्टॉप नसून कॉमा, अजूनही काहीही होऊ शकतं’

MahaDBT | ऊस तोडणी यंत्र खरेदीसाठी महाडीबीटी संकेतस्थळावर अर्ज करण्याचे आवाहन

Maharashtra Political News | अजित पवारांनी संजय राऊतांना का सुनावलं?, संजय शिरसाटांनी सांगितले कारण, म्हणाले…