Pune Murder Case | पुणे : बँकेच्या रिकव्हरी नोटीस वाटप करण्यासाठी गेलेल्या व्यक्तीचा चाकूने भोकसून खून

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Murder Case | बँकेच्या रिकव्हरीच्या नोटीस वाटप करण्यासाठी गेलेल्या एका व्यक्तीच्या पोटात धारदार चाकूने भोकसून खून केल्याची घटना समोर आली आहे. हा धक्कादायक प्रकार दौंड तालुक्यातील वासुंदे हद्दीत शुक्रवारी (दि.1) रात्रीच्या सुमारास घडला आहे. याप्रकरणी दौंड पोलीस ठाण्यात (Daund Police Station) गुन्हा दाखल केला असून पोलीस अज्ञात मारेकऱ्याचा शोध घेत आहेत.

प्रवीण मळेकर असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याबाबत मुलगा ऋषिकेश प्रवीण मळेकर (वय-30 रा. गुरुवार पेठ, कस्तुरी चौक, पुणे) यांनी दौंड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात मारेकऱ्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.(Pune Murder Case)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे वडील प्रवीण मळेकर हे शुक्रवारी सकाळी दुचाकीवरुन बँक ऑफ महाराष्ट्र शाखा बारामती या बँकेचे रिकव्हरी नोटीस वाटप करण्यासाठी बारामती येथे गेले होते. त्यानंतर फिर्य़ादी यांना एका व्यक्तीचा फोन आला. मळेकर तुमचे कोण आहेत. कोणीतरी त्यांना चाकू मारला असून ते जखमी अवस्थेत रस्त्यावर पडले आहेत. त्यांना रुग्णवाहिकेतून विश्वराज हॉस्पिटल येथे दाखल केले आहे. हा प्रकार बारामती फलटण रोडवरील वासुंदे गावच्या हद्दीतील पेट्रोलपंपासमोर झाला असल्याचे सांगण्यात आले.

घटनेची माहिती मिळताच ऋषिकेश मळेकर यांना हॉस्पिटलमध्ये धाव घेतली.
त्यावेळी त्यांना प्रवीण मळेकर यांच्या पोटात धारदार हत्याराने भोकसल्याचे सांगितले.
या घटनेत प्रविण यांच्या पाठीवर, कमरेजवळ वार करण्यात आले आहेत.
मळेकर यांना उपचारासाठी रुग्णालयात आणण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

MLA Siddharth Shirole | बोपोडी चौक वाहतूक आठवडाभरात मार्गी लागेल – आमदार सिद्धार्थ शिरोळे

Pulse Polio Vaccination | पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेअंतर्गत बालकांना पूर्वीचा डोस अवश्य द्यावा – मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण

Maratha Protesters In Solapur | संतप्त मराठा आंदोलकांनी अजित पवार गटाच्या आमदारपुत्राला गावातून परत पाठवले