MLA Siddharth Shirole | बोपोडी चौक वाहतूक आठवडाभरात मार्गी लागेल – आमदार सिद्धार्थ शिरोळे

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – MLA Siddharth Shirole | येत्या आठवडाभरात बोपोडी चौकातील वाहतूक मार्गी लागेल,असे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी शनिवारी सांगितले.

महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विकासजी ढाकणे, पथ विभाग प्रमुख अनिरुद्ध पावसकर, पोलिस उपायुक्त शशिकांत बोराटे यांच्या समवेत आमदार शिरोळे यांनी चौकातील वाहतुकीची पाहणी केली तसेच अधिकाऱ्यांसमवेत येत्या बुधवारी व्यापारी आणि स्थानिक रहिवाशांची वाहतूक संदर्भात बैठक घेण्यात येणार आहे.(MLA Siddharth Shirole)

बोपोडी चौकामध्ये रस्त्याची कामे अर्धवट आहेत, तिथे बरेच अपघात होत आहेत. तसेच हॉस्पिटल क्रॉसिंगला सुद्धा अडथळे येत आहेत, अशा प्रश्नांवर सविस्तर चर्चा झाली. बुधवार पर्यंत बोपोडी चौकातून डाव्या बाजूकडे हॅरीस ब्रिजकडे जाणारा रस्ता पूर्ण होईल. त्याचबरोबर त्याठिकाणी असलेला सिग्नल बुधवारपर्यंत हलविला जाईल, असे आमदार शिरोळे यांनी सांगितले.

तसेच जुना मुंबई पुणे हायवेवरील जय हिंद टॉकीजच्या पुढच्या टप्प्याच्या रस्त्याचे काम दहा तारखेपर्यंत पूर्ण होईल.
त्याठिकाणी दुहेरी वाहतूक तातडीने सुरू करावी. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर रस्त्यावर दुहेरी वाहतूक सुरु करावी
आणि खडकीवासीयांना दिलासा द्यावा, अशी मागणी आमदार शिरोळे यांनी पाहणीच्या वेळी केली.

या पाहणीच्या वेळी प्रकाश ढोरे, आनंद छाजेड, सुनिताताई वाडेकर, दुर्योधन भापकर, संगीताभाभी गवळी, धर्मेश शहा,
कार्तिकीताई हिवरकर, नेहाताई गोरे, मनीषाताई कांबळे, अजित पवार, अनिल भिसे, विजय ढोणे, शांतीलाल शेठ, हेमंत शहा,
अनिरुद्ध वाकीकर, अनिकेत भिसे, भूषण जाधव, जय भाटीया, देवेंद्र बिडलान, राजेश पिल्ले, योगेश कर्नुर आदि उपस्थित होते.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Pimpri Chinchwad Crime | पिंपरी : पोलीस उपनिरीक्षक असल्याची सांगून उकळले पैसे, तरुणीला ब्लॅकमेल करणाऱ्या तरुणावर FIR

Maratha Protesters In Solapur | संतप्त मराठा आंदोलकांनी अजित पवार गटाच्या आमदारपुत्राला गावातून परत पाठवले

Pimpri Cheating Fraud Case | पिंपरी : एमटीडीसीचे बुकिंग कॅन्सल करणं पडलं महागात, निवृत्त नेव्ही ऑफिसरला साडेसात लाखांचा गंडा